मोबाइल टाळा आणि क्षमतेनुसार ध्येय निश्चित करा:माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच त्यांच्या अभ्यासातील सातत्य, वेळेचे नियोजन आणि मेहनतीची कसोटी पाहणारी परीक्षा आहे. परीक्षेत मिळालेले यश अंतिम ध्येय न मानता भविष्यातील मोठ्या यशाची पहिली पायरी म्हणून विद्यार्थ्यांनी त्याकडे पाहावे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीचे आणि क्षमतेचे क्षेत्र ओळखून त्यानुसार ध्येय निश्चित करावे. अडचणी आल्या तरी खचून न जाता सातत्याने प्रयत्न करण्याची वृत्ती…