Headlines

चीनमध्ये ऑटो कंपन्यांनी 40 लाख गाड्या परत मागवल्या:यात टेस्लाच्या 30 लाख गाड्या, दरवाजा हँडलमधील समस्यांमुळे निर्णय घेण्यात आला

चीनच्या नियामकाने सुरक्षिततेच्या चिंतेमुळे टेस्ला आणि अनेक प्रमुख चीनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांना 40 लाखांहून अधिक गाड्या परत बोलावण्यास सांगितले आहे. या वर्षातील ही सर्वात मोठी ऑटो रिकॉल आहे, जी प्रामुख्याने वाहनांच्या फ्लश किंवा लपलेल्या डोर हँडलमध्ये येत असलेल्या समस्यांशी संबंधित आहे. 29.8 लाख टेस्ला गाड्यांमध्ये डोर हँडलची सुरक्षितता जोखीम चीनच्या स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन फॉर मार्केट…

Read More

माझा निर्णय कायद्याच्या चौकटीत:शिवसेना पक्ष-चिन्हाच्या वादावर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले- सुप्रीम कोर्ट योग्य निर्णय देईल

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि त्यानंतर ‘मूळ पक्ष व धनुष्यबाण चिन्ह’ यावर सुरू असलेला कायदेशीर लढा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी बहुमताच्या आधारावर शिंदे गटाच्या बाजूने कौल दिल्यानंतर, उद्धव ठाकरे गटाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिथे ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद…

Read More

खबर हटके- कार विकणारा निघाला राजकुमार:रुग्णांना मिळत आहे सुगंधी ऑक्सिजन; अजगराला कर्करोग, केमोथेरपीने वाचला जीव

बेल्जियममध्ये एक कार विक्रेता राजकुमार निघाला. तर, नागपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सुगंधी फ्लेवर्ड ऑक्सिजन दिला जात आहे. तिकडे, इंग्लंडमध्ये एका अजगराला कर्करोग झाला तेव्हा कीमोथेरपीने त्याचा जीव वाचवण्यात आला. ब्राझीलमध्ये आई-मुलीने कचऱ्यात फेकलेल्या 8,000 बाटल्यांपासून सात खोल्यांचे घर बनवले. तर, अमेरिकेत व्हिडिओ गेम खेळण्यासाठी सैनिकांना चार दिवसांच्या सुट्टीची ऑफर देण्यात आली आहे. आज ‘खबर हटके’मध्ये…

Read More

नातवाच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकताच आजीनेही सोडला प्राण:काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मुलाचे निधन

काही महिन्यांपूर्वी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.हे दुःख ताजे असतानाच नातवाचाही अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समजताच आजीनेही क्षणात प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेमके प्रकरण काय उदगीर शहरातील नळेगाव रोडवरील उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री दुचाकी कठड्याला धडकून पुलाखाली कोसळल्याने राजू ज्योतीराम सूर्यवंशी (वय २८) याचा जागीच मृत्यू…

Read More

सारा अली खानच्या फोटोसाठी पापाराझी भांडू लागले:शिवीगाळ, धक्का-बुक्की केली; घटनेनंतर अभिनेत्री हसताना दिसली

सारा अली खान शुक्रवारी दिसली. याच दरम्यान ती पोज देत होती, तेव्हा तिच्यासमोर दोन पापाराझी फोटोग्राफर्समध्ये कॅमेराच्या जागेवरून वाद सुरू झाला. बघता बघता दोघे एकमेकांना धक्के मारू लागले आणि प्रकरण शिवीगाळ करण्यापर्यंत पोहोचले. अचानक झालेल्या या वादामुळे सारा अली खान काही काळ गोंधळलेली दिसली. व्हिडिओमध्ये ती परिस्थिती पाहून घाबरून हसतानाही दिसली आणि त्यानंतर ती तिथून…

Read More

विशाखा राऊतांचे जात प्रमाणपत्र रद्द:समाधान सरवणकरांचा सवाल, ओबीसी समाजावर अन्याय? व्यवसाय मजुरी आणि घरकाम कसे?

ठाकरे गटाच्या नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे. जात पडताळणी समितीने त्यांना पालघरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. संबंधित प्रमाणपत्र देण्यासाठी पालघरचे उपविभागीय अधिकारी सक्षम प्राधिकारी नसल्याचे समितीच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर विशाखा राऊत यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून…

Read More

राहुल गांधींचा कार्यक्रम उधळण्याची भाषा म्हणजे दहशतवाद:संजय राऊतांचा भाजप-ABVP वर हल्लाबोल, फडणवीस-शहांवरही केले गंभीर आरोप

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याला पोलिसांनी घातलेल्या अटी आणि COEP परिसरातील काँग्रेस-NSUI आणि ABVP कार्यकर्त्यांमधील वादावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. “भाजप हा डरपोक लोकांचा पक्ष असून, सत्तेच्या कवचकुंडलांमुळेच त्यांची ही दादागिरी सुरू आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या पडझडीला…

Read More

पोलिस श्वानांसाठी फडणवीसांचा संवेदनशील निर्णय:दहा वर्षांच्या निष्ठेची परतफेड; निवृत्तीनंतरही मिळणार आपुलकीची साथ

पोलिस दलासाठी अनेक वर्षे निष्ठेने आणि धाडसाने सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलिस दलात सलग दहा वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांना आता इतरत्र दत्तक देण्याऐवजी पोलिस विभागासोबतच ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या भोजनापासून ते दैनंदिन देखभालीपर्यंतचा संपूर्ण खर्च गृहविभागाकडून केला जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षे पोलिसांसोबत…

Read More

करीना कपूर खान प्रेग्नंट नाही:45 व्या वर्षी अभिनेत्री तिसऱ्यांदा आई होण्याच्या बातम्यांना तिच्या टीमने अफवा म्हटले

अभिनेत्री करीना कपूर खान तिसऱ्यांदा गर्भवती असल्याच्या बातम्यांना तिच्या टीमने चुकीचे ठरवले आहे. सोशल मीडियावर गर्भधारणेच्या अफवा पसरल्यानंतर, टीमने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना याची पुष्टी केली की करीना गर्भवती नाही. शुक्रवारी मुंबईत करीना कपूरचा एक व्हिडिओ समोर आला होता. यानंतर लोकांनी अंदाज लावला की ती तिसऱ्यांदा आई होणार आहे. व्हायरल क्लिपमध्ये करीना कपूर तिच्या गाडीकडे जाताना…

Read More

प्रेमाचा सल्ला देत भामट्याची हातचलाखी:सेवानिवृत्त शिक्षकाची 60 हजार रुपये किंमतीची अंगठी पळवली

काका, समोर चोरी झाले आहे. आम्ही पोलिस आहोत, तुम्ही तुमच्या अंगठ्या काढून ठेवा असा प्रेमाचा सल्ला देत एका भामट्याने सेवानिवृत्त शिक्षकाच्या हातातील अंगठी पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २१ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. नेमके प्रकरण काय आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील पंचशिल नगर येथील रहिवासी…

Read More