Headlines

53 वर्षीय अर्जुन रामपालने केले दुसरे लग्न:14 वर्षांनी लहान गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत लग्न नोंदणी केली, या नात्यातून त्यांना दोन मुले

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने त्याची दीर्घकाळापासूनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्ससोबत लग्न केले आहे. बुधवारी गोव्यात त्यांनी हे लग्न नोंदवले आहे. दोघांनी उत्तर गोव्यातील म्हापसा येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात लग्नाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. पीटीआयच्या वृत्तानुसार, यावेळी त्यांचे जवळचे मित्र उपस्थित होते. स्थानिक कायद्यानुसार, पहिल्या आणि दुसऱ्या स्वाक्षरीदरम्यान १५ दिवसांची प्रतीक्षा आवश्यक असते. हा कालावधी माफ करून घेण्यासाठी…

Read More

आषाढी यात्रेनंतर वाळवंट वाऱ्यावर:भाविकांची सुरक्षा विठ्ठल भरवशावर

आषाढी यात्रेनंतर पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात प्रशासकीय यंत्रणा बेजबाबदार झाली आहे. लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुरक्षा आता प्रशासकीय टोलवाटोलवीमुळे विठ्ठलाच्याच भरवशावर सोडून दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी यात्रेनंतर नगरपालिका, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुरक्षेची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याची परंपरा सुरू आहे. भाविकांच्या जिवाशी खेळणारी ही वागणूक…

Read More

पंढरीत डाळिंबाची आवक वाढल्याने दरात निम्म्याने घट:नाईलाजाने मिळेल त्या‎दराने डाळिंबाची विक्री‎

दिल्ली परिसरात पाऊस झाल्याने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ दिवसांत डाळिंबाची आवक वाढली आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर सरासरी १०० रुपये प्रतिकिलो घसरले आहेत. सध्या डाळिंबाचा दर किमान ४० ते कमाल १२० रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. डाळिंबाचे घटलेले क्षेत्र वाढत आहे. शिवाय दिल्ली परिसरात झालेल्या पावसाचा परिणामही दरावर झाला….

Read More

बिहारच्या बेतियात घरात बस घुसली, 5 ठार:मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सुरू होता ऑर्केस्ट्रा, वडिलांचाही जीव गेला

मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका ऑर्केस्ट्रात बस घुसून 5 जण ठार झाल्याची भयंकर घटना बिहारच्या बेतियात घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बेतिया-लौरिया मुख्य मार्गावरील पराऊ टोला बनकटवालगत लौरिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी रात्री उशिरा घटना घडली. बसने ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी जमलेल्या लोकांना चिरडले. त्यात 12 हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये लौरिया पोलीस स्टेशन हद्दीतील…

Read More

पिठात चक्क कीटक, अन् काळे तेल:गायत्री मेवाड अन् छप्पन भोगचा परवाना निलंबित, दोन्ही हॉटेलमध्ये अन्नसुरक्षेचे गंभीर उल्लंघन, अन्न् व औषध प्रशासनाची कारवाई

‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी (२१ ऑगस्ट) केलेल्या कारवाईत क्रांती चौकातील मे. गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड आणि बीड बायपास रोड, सातारा परिसरातील मेसर्स छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल या दोन्ही आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित केले. गायत्री मेवाडमध्ये स्वयंपाकघरात भाजीसाठी कापून ठेवलेले पनीर दुर्गंधीयुक्त आढळले. तयार ग्रेव्ही…

Read More

मेहूणबारे:मेहुणबारे येथे मध्यरात्री सहा बंद घरांमध्ये चोरी

चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल ६ बंद घरे फोडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आली. चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरातील ६१ हजार ६०० रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह इतर घरांमधून ऐवज लांबवला आहे. येथील रहिवासी निर्मला यशवंत महाजन (वय ४८) यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा मध्यरात्री १.३० ते सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास अज्ञात…

Read More

ट्रकला धडकलेल्या कारचा चक्काचूर, 3 जणांचा मृत्यू:चालकासह 8 जण जखमी, नागपूरला रेफर; नागपूरहून कुबेरेश्वर धामला जात होते

मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई फोरलेनवर जीतू ढाब्याजवळ एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला. घटनास्थळी पती-पत्नीसह तीन जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी पहाटे 3:30 वाजता झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कारमधील सर्वजण भाविक होते,…

Read More

दिवाळी सणात समृद्धी महामार्गावरून संभाजीनगर ते ठाणे धावणार एसटी:भाडेही लवकरच निश्चित होणार, प्रायोगिक तत्त्वावर बससेवा सुरू करणार

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) समृद्धी महामार्गावर बससेवा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर ते ठाणे या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर एक एसटी बस सुरू करण्यात येणार आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत असल्याने एसटीने हा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगरहून ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना सध्या विविध…

Read More

खंडाळा:जीवाला जीव देणारा नव्हे तर जीवनासाठी दिशा देणारा मित्र बनवा : इंदुरीकर महाराज

आजची मुले म्हणतात हा माझा जिगरी मित्र आहे, जीवाला जीव देणारा आहे. अरे, जीवाला जीव देऊन काय उपयोग? जर तुझं जीवनच वाया जात असेल तर अशा मैत्रीचा काय फायदा? मित्र असा बनवा जो तुम्हाला दारू, गुटखा या वाईट सवयींतून बाहेर काढेल. जो व्यसनाकडे नाही तर शिक्षणाकडे नेईल. जो म्हणेल अरे अभ्यास कर आणि आई-बापाचं नाव…

Read More

महामार्गावरील अपघातामध्ये गंभीर जखमी व्यक्तीचा मृत्यू:कन्नड रुग्णालयावर नातेवाइकांचा तीव्र संताप‎

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर कन्नड शहरालगत रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा कन्नड ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारामुळे, वेळेवर रुग्णवाहिका व ऑक्सिजन न मिळाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. गारगोटी (ता. कन्नड) येथील सुभाष मूलचंद राठोड (४०) हे दुचाकीने (एमएच २० ईडब्ल्यू ७२७१) छत्रपती संभाजीनगरकडून कन्नडकडे येत असताना एका ट्रकने अचानक वळण घेतल्याने अपघात…

Read More