घर बांधण्यास 5 लाख रुपयांची मागणी करीत विवाहितेचा छळ:सिल्लोड शहर पोलिस ठाण्यामध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
माहेरहून घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन, मारहाण करत घरातून हाकलून दिल्याची घटना शुक्रवारी सिल्लोड शहरात उघडकीस आली. या प्रकरणी पीडित विवाहिता मोनिका अविनाश गायकवाड (३२) यांच्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात सासरच्या चौघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती अविनाश सोनाजी गायकवाड,…