Headlines

लोकशाही म्हणजे कायद्याचे राज्य, बहुमताचे नव्हे:सुरेश द्वादशीवार यांचे संविधानासमोरील प्रश्नांवर व्याख्यान

संविधान केवळ सामान्य नागरिकांसाठी नियम नसून सरकारला चौकटीत बांधून ठेवणारी व्यवस्था आहे. जनता आणि सरकार या दोघांचेही अधिकार व मर्यादा संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. मात्र, नागरिकांना आपल्या घटनात्मक अधिकारांची पुरेशी जाणीव नसल्याने सरकारकडून मर्यादा ओलांडण्याची शक्यता निर्माण होते. लोकशाही म्हणजे बहुमताचे राज्य नव्हे, तर कायद्याचे राज्य होय. जनतेला जो न्याय लागू होतो, तोच सरकारलाही लागू…

Read More

महसूल विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे स्वयं पुनर्विकासाला गती मिळणार:भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन

इतर हक्कात सोसायटीचे नाव चढवले जाईल, डिम्ड कनव्हेन्स झाल्यावर महसूलकडे सुनावणी घेण्याची गरज नाही. कालमर्यादेत डिम्ड कनव्हेन्सला शिक्कामोर्तब करण्याची आवश्यकता आहे. अकृषक कराची वसुली थांबवावी. चुकीच्या वसुली केल्या असतील तर त्याचा परत परतावा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल आणि यूएलसी सदनिकांसाठी निश्चित कार्यपद्धती करून सर्व विभागांसाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला असून यामुळे…

Read More

ऑनलाइन गेमिंग फ्रॉड प्रकरणी ईडीची मोठी कारवाई:नागपूर, गोंदिया, अहमदाबादमध्ये छापे; कोट्यवधींची संपत्ती जप्त

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) नागपूर उप-क्षेत्रीय कार्यालयाने ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंग फसवणूक प्रकरणाचा तपास तीव्र करत मोठी कारवाई केली आहे. आरोपी अनंत नवरत्न जैन उर्फ सोंतू जैन आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित नागपूर, गोंदिया आणि अहमदाबादमधील एकूण १२ ठिकाणांवर १८ ऑगस्ट २०२६ रोजी धडक छापेमारी करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (PMLA) ही कारवाई करण्यात आली असून,…

Read More

भारत-ब्राझीलने दूरसंचार-आयसीटी सहकार्यासाठी करार केला:माहिती, अनुभव आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्यास मदत

पुणे येथे झालेल्या ‘ब्रिक्स आयसीटी ट्रॅक’ बैठकीदरम्यान भारत आणि ब्राझीलने दूरसंचार तसेच माहिती-संचार तंत्रज्ञान (आयसीटी) क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य माधवराव सिंदिया आणि ब्राझीलचे दूरसंचार मंत्री फ्रेडरिको डी सिपेरा फिलो यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे दोन्ही देशांमधील दूरसंचार आणि आयसीटी क्षेत्रातील माहिती, अनुभव आणि सर्वोत्तम…

Read More

माती-पाणी संवर्धनासाठी हजारो नागरिक चालले:छत्रपती संभाजीनगरमध्ये महावॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर येथे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी जलसंधारण दिनानिमित्त महावॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. ‘माती आणि पाणी’ संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित या पदयात्रेत हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. क्रांती चौक ते महात्मा फुले पुतळा या मार्गावर ही जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत १५ तारखेपासून मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती मोहीम…

Read More

ज्ञानभारतमद्वारे हस्तलिखितांचा ठेवा सर्वांसाठी खुला:केंद्रीय संस्कृती मंत्रालयाचे संचालक इंद्रजित सिंग यांची घोषणा

प्राचीन भारतीय परंपरेचा वारसा जपणाऱ्या हस्तलिखितांचा ठेवा केंद्रशासनाच्या “ज्ञानभारतम्” या अभियानाद्वारे डिजिटल स्वरूपात सर्वांसाठी खुला होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संस्कृती मंत्रालयाचे संचालक इंद्रजित सिंग यांनी केले. महाराष्ट्रातील हस्तलिखितधारक निवडक व्यक्ती आणि काही संस्थांशी भांडारकर संस्थेत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी राज्यातील शंभराहून अधिक व्यक्ती आणि संस्थांची उपस्थिती होती. हस्तलिखितांची नोंदणी, जतन, डिजिटायझेशन आणि संशोधन…

Read More

सरकारने म्हटले- इथेनॉलमुळे साखर महाग झाली नाही:एका महिन्यात ₹7.52 ने दर वाढले, देशभरात ₹55.70 किलोने विकली जात आहे

सरकारने ते दावे फेटाळले आहेत, ज्यात म्हटले होते की साखरेपासून इथेनॉल बनवल्यामुळे बाजारात त्याचे दर वाढले आहेत. अन्न आणि ग्राहक मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, कमी उत्पादन, सणासुदीच्या हंगामातील मागणी आणि साठेबाजीमुळे किमती वाढल्या आहेत. साखरेच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी स्टॉक मर्यादा आणि शुल्कमुक्त आयात यांसारखी पावले उचलण्यात आली आहेत. इथेनॉलसाठी ऊसाचा वापर कमी झाला मंत्रालयाने म्हटले…

Read More

नागपुरात कुख्यात गुंडाची प्रेम प्रकरणातून हत्या:जुन्या वादातून झालेल्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

नागपुरात प्रेमसंबंध आणि जुन्या वादातून एका कुख्यात गुंडाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नरेंद्रनगर पूल आणि सुंदरबन परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी अजनी आणि बेलतरोडी पोलिसांनी तत्परता दाखवत दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. मयत गुंडाचे नाव गौरव पंकज रगडे (वय २५) असून, तो ‘गमछू’ हत्याकांडासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी होता आणि नुकताच…

Read More

विलास घुले हत्याप्रकरणी बीडमध्ये धडक मोर्चा:"…तर मराठा आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या नोकऱ्यांना चॅलेंज करू", गुणरत्न सदावर्तेंचा इशारा

मित्र उमेश माने याच्या अनैतिक संबंधांतून निर्माण झालेल्या वादातून 21 जून रोजी झालेल्या विलास घुले खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा हात असल्याचा आरोप करत, त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. या हत्या प्रकरणात सध्या 10 आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, या प्रकरणात आता खासदारपुत्रावर कारवाईच्या मागणीसाठी आयोजित करण्यात…

Read More

'MH 12' पुण्याची ओळख कायम:वाहनांसाठी लवकरच 'अंक-अक्षर' मिश्रित नवी सिरीज

पुण्यातील वाहनांची ओळख असलेली ‘एमएच 12’ ही मालिका कायम राहणार आहे. ही मालिका संपत आल्याने आता ‘एमएच 12 1 ए’ या नव्या मालिकेचा पर्याय समोर आला आहे. देशात प्रथमच वाहनांच्या नंबरप्लेटवरील अक्षरांच्या सिरीजमध्ये अंक आणि अक्षर यांचा एकत्रित वापर केला जाणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) सध्या ‘एमएच 12’ अंतर्गत शेवटची ‘झेड झेड’ ही…

Read More