लासलगाव रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना होणारा त्रास थांबणार:मध्य रेल्वेचे उपप्रबंधक मुकेश कुमार मीना यांचे आश्वासन
रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या वाहनांवर रेल्वे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात असल्याच्या तक्रारींची योग्य ती दखल घेतली जाईल. प्रवाशांना त्रास होणार नाही, तसेच रेल्वे अंडरपासमधील खड्ड्यांवरही काम केले जाईल, असे आश्वासन मध्य रेल्वेचे उपप्रबंधक मुकेश कुमार मीना व अधिकाऱ्यांनी स्थानक पाहणीदरम्यान दिले. लासलगाव रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी उपप्रबंधक मुकेश कुमार…