खामगाव:श्री गोरक्ष विद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या श्री गोरक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य मोहन पाटील सोनवणे होते. तर संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक अभिलाष पाटील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम ढोल-ताशा, लेझीम…