धनगरवाडीत हरिणाची शिकार उघडकीस:16 किलो मांस आणि कातडीसह दोघांना अटक, वन विभाग व गुन्हे शाखेची कारवाई
सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी शिवारातील एका शेतात हरिणाची शिकार करून मांस वाटून घेतांना वन विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ता. १६ छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. घटनास्थळावरून १६ किलो मांस व हरिणाची कातडी जप्त करण्यात आली आहे. वन विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव…