Headlines

धनगरवाडीत हरिणाची शिकार उघडकीस:16 किलो मांस आणि कातडीसह दोघांना अटक, वन विभाग व गुन्हे शाखेची कारवाई




सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी शिवारातील एका शेतात हरिणाची शिकार करून मांस वाटून घेतांना वन विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ता. १६ छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. घटनास्थळावरून १६ किलो मांस व हरिणाची कातडी जप्त करण्यात आली आहे. वन विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी शिवारात काही जण हरिणाची शिकार करीत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यावरून वन विभागाच्या पथकाने मागील दहा दिवसांपासून या भागात पाळत ठेवली होती. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नियुक्त केले होते. दरम्यान, आज दुपारच्या सुमारास काही जणांनी हरिणाची शिकार करून त्याचे मांस कापून त्याचे वाटणी करीत असल्याची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने, वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे यांच्यासह स्थानिक गुुुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप मोरे, जमादार साईनाथ कंठे, कुमार मगेर, सुभाष घुगे यांच्या पथकाने तातडीने घटनासाथळी धाव घेतली. या पथकाने शेतातून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून हरिणाची शिकार करण्यासाठी लागणारे जाळे, तसेच घटनास्थळावरून १६ किलो मांस, हरिणाची कातडी जप्त केली आहे. याप्रकरणी वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणात वन विभागाने दोघांची चौकशी सुरु केली असून यामध्ये आणखी काही जणांचा समावेश असल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे. याशिवाय यापुर्वी शिकारीच्या किती घटना केल्या आहेत याची माहितीही घेतली जात असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *