Headlines

इंडिगो विमानातील इंजिनमध्ये बिघाड, चेन्नईत आपत्कालीन लँडिंग:224 प्रवासी विमानात होते; पायलटला इंजिन निकामी झाल्याची शंका आली

चेन्नई विमानतळावर मंगळवारी रात्री उशिरा इंडिगोच्या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. हे विमान कोलकाता येथून चेन्नईला येत होते. विमान चेन्नईत उतरणार होते, तेव्हा वैमानिकाला डावे इंजिन निकामी झाल्याचे जाणवले. त्याने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला याची माहिती दिली, त्यानंतर चेन्नई विमानतळावर रात्री 11:29 वाजता पूर्ण आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली. यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग…

Read More

‘कमवा अन् शिका’च्या 3 हजार प्रशिक्षणार्थींचे संभाजीनगरातील बजाज ऑटोसमोर आंदोलन:पदवीसह मानधनवाढीची मागणी; कामगारांसारखे राबवून घेत असल्याचा आरोप

‘कमवा अन् शिका’ संकल्पनेअंतर्गत टीम लीज फाउंडेशनमार्फत बजाज ऑटो कंपनीत विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत सुमारे ३ हजार युवक-युवतींनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी (११ ऑगस्ट) सकाळी सहापासून बजाज ऑटोच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ‘काम बंद’ आंदोलन केल . पदवी न मिळणे, अल्प मानधनावर कामगारांप्रमाणे काम करून घेणे असा आरोप करत मानधनात वाढ न करणे व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या…

Read More

Rohit Sharma TV Debut | Rohit Sharma Show Family Feud India Launch

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आंतरराष्ट्रीय T20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, क्रिकेटपटू रोहित शर्मा लवकरच एका टीव्ही शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ‘द रोहित शर्मा शो’ नावाचा हा शो सोनी लिव्हवरही स्ट्रीम होईल. नुकताच या शोचा एक टीझर आला आहे. सोनीने अद्याप शोच्या फॉरमॅटबद्दल जास्त माहिती शेअर केलेली नाही. मात्र, सोनीच्या प्रीव्ह्यू पेजवर तो रिॲलिटी…

Read More

रीलच्या नादात वाल्मीच्या तलावात विद्यार्थी बुडाला:शूटिंग करताना पाण्याचा अंदाज आला नाही

इन्स्टाग्राम रील बनवण्याच्या नादात वाल्मी येथील तलावातील खड्ड्यात बुडून १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हसनैन मोईनोद्दीन शेख (१६, रा. शहानगर, बीड बायपास) असे त्याचे नाव. तो बारावीत शिकत होता. हसनैन सकाळी २ मित्रांसोबत वाल्मी परिसरातील तलावावर रील तयार करण्यासाठी गेला होता. व्हिडिओ काढत असताना तो पाण्यात उतरला. मात्र, या तलावात मोठे खड्डे आहेत, याची त्याला…

Read More

बिडकीनमध्ये ऑरिकशेजारीच एमआयडीसीला हवी 2 हजार हेक्टर जागा:5 मोठ्या उद्योगांकडून जमिनीसाठी विचारणा केल्यानंतर एमआयडीसीचा सरकारकडे प्रस्ताव

ऑरिकने बिडकीनमध्ये विस्तार करण्यासाठी ३२०० हेक्टर जमिनीची सरकारकडे मागणी केल्यानंतर आता त्यालगतच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही (एमआयडीसी) नव्या औद्योगिक वसाहतीसाठी २ हजार हेक्टरची जागा मागितली आहे. गेल्या महिनाभरात ५ मोठ्या कंपन्यांनी भूखंडांसाठी विचारणा केल्यानंतर एमआयडीसीने जागेच्या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. प्रस्तावित वसाहतीसाठी सरकारने जमिनी दिल्यास ही शहर-परिसरातील नववी एमआयडीसी…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी:फडणवीसांच्या गृहजिल्ह्यातीलच प्रकार, आता 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्याची तयारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यातच भाजपच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीचा मुद्दा चर्चेत आला आहे. रविवारी नागपुरातील सुरेश भट सभागृहात दिव्यांगांना जयपूर फूट आणि विविध सहाय्यक साधनांचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपच्या 110 नगरसेवकांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, त्यापैकी सुमारे 40 नगरसेवक कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत…

Read More

Sujat Ambedkar Attacks Sharad Pawar; Claims Alliance With BJP Since 2014

भारतीय जनता पक्ष जेव्हापासून सत्तेत आला आहे, तेव्हापासून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. ‘फोडा आणि राज्य करा’ ही ब्रिटिशांच्या काळातील पॉलिसीच भाजपा राबवत आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबे . सुजात आंबेडकर म्हणाले की, 2014 मध्ये उद्धव ठाकरे यांना मजबूर करून भाजपासोबत जाण्यास शरद पवारांनीच…

Read More

शहरातील पाचपैकी एक मतदार पडताळणीबाहेर!:पारनेर, कर्जत-जामखेडमध्ये 38,31 हजार नोंदी अनकलेक्टेबल ; 4.29 लाख मतदारांची पडताळणी बाकी‎

विशेष सखोल मतदारयादी पुनर्रचनेत (एसआयआर) जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांमधील तब्बल ४ लाख २९ हजार १०८ मतदारांच्या नोंदी पडताळणीबाहेर (अनकलेक्टेबल) असल्याचे ११ ऑगस्टच्या अहवालातून समोर आले. हे प्रमाण जिल्ह्यातील एकूण मतदारांच्या ११.२६ टक्के आहे. विश . 1) मतदार ‘पडताळणीबाहेर’ म्हणजे काय? एसआयआरमध्ये घरभेटीद्वारे मतदारांची पडताळणी केली जाते. मतदाराची माहिती निश्चित करता न आल्यास किंवा त्याची सध्याची…

Read More

सावेडीत आदिवासी संस्कृतीचा अनोखा उत्सव:निसर्गाचा हुंकार ढोलगजर; टिपऱ्या-फुगड्यांच्या तालावर सांस्कृतिक जागर‎

अहिल्यानगर धावपळीच्या शहरी वातावरणात जेव्हा पारंपरिक ढोल-ताशांचा गजर आणि टिपऱ्यांचा आवाज घुमला, तेव्हा सावेडीचा परिसर जणू अरण्यसंस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाला. आदिवासी सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित सोहळ्याने अहिल्यानगरकरांना एका समृद्ध वारशाची प्रचिती दिली. प्रोफेसर कॉलनी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य सांस्कृतिक मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेतील आबालवृद्ध सहभागी झाले होते….

Read More

निवडणूक आयोगाने चोरांच्या हातात पक्षचिन्ह दिले!:शिवसेना सुनावणी, खाण माफिया आणि संसदेतील मोदी-शहांच्या अनुपस्थितीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत सडकून टीका केली. राज्यातील आदिवासी भागात होणारा भ्रष्टाचार, आश्रमशाळेत सर्पदंशाने झालेले मृत्यू, खाण माफियांचा सुळसुळाट आणि शिवसेना पक्षचिन्हाची सुनावणी या सर्वच मुद्द्यांवरून राऊत यांनी सरकारचे वाभाडे काढले. आश्रमशाळेतील मृत्यू आणि आदिवासी मंत्र्यांवर निशाणा आदिवासी भागांमध्ये…

Read More