Headlines

शिवचरित्र आदर्श मानून राजाभाऊंनी केलेले कार्य अभिमानास्पद:कर्तृत्व आणि दातृत्व म्हणजेच आमदार राऊत‎

छत्रपती शिवरायांचे चरित्र डोळ्यासमोर ठेवून अठरापगड जातीच्या घटकांना बरोबर घेऊन आमदार राजेंद्र राऊत यांनी सकल समाजघटकांना न्याय देत केलेले लोकसेवा आणि विकासाचे काम अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काढले. येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार राऊत यांची विधानपरिषद सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आयोजित केलेल्या जाहीर सत्कार…

Read More

मुरूमाने मोहोळ-सोलापूर सर्व्हिस रोड अरुंद; विद्यार्थ्यांसह वाहनचालकांची होतेय गैरसोय:भराव टाकल्याने वाहतुकीस अडथळा; मुरूम हटवण्याची मागणी‎

मोहोळ-सोलापूर मार्गावरील सर्व्हिस रोडलगत असलेल्या अंडरग्राउंड गटारीच्या शेजारी काही गाळेधारकांनी दुकानांपर्यंत चारचाकी वाहने नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम टाकल्याने सर्व्हिस रोड अरुंद झाला आहे. परिणामी या मार्गावरून नियमित ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, नागरिक तसेच वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित ठिकाणी टाकण्यात आलेला मुरूम तातडीने हटवून सर्व्हिस रोड पूर्ववत रुंद करावा, अशी…

Read More

शाळा, कॉलेजातील 300 विद्यार्थिनींनी सादर केली पारंपरिक नागपंचमीची गाणी:अकलूजला शिक्षण प्रसारक मंडळ, प्रताप क्रीडा मंडळाचे आयोजन‎

लाट्या बाई लाट्या.. चंदनी लाट्या, फू-बाई फू फुगडी फू…, काटवट कणा.., खिस बाई खिस… दोडका खिस, पिंगा गं पोरी पिंगा…, पावसाचं पाणी कवलात, पाटलाची लेक मी डौलात.., नाच गं घुमा कशी मी नाचू… अशा पारंपरिक गाण्यांवर विद्यार्थिनींच्या पावलांनी ठेका धरला. त्यानंतर उखाण्यांच्या जुगलबंदीने रत्नाई पारंपरिक नृत्य स्पर्धेत रंग भरले. अकलूज येथे संपन्न झालेल्या रत्नाई पारंपरिक…

Read More

आयुक्तालयासह महसूलमध्ये पदोन्नती घोटाळा:न्यायालयाने फटकारल्यानंतरही सुधारणा नाही, निवृत्त कर्मचाऱ्यांचे 15 ला आंदोलन‎

विभागीय आयुक्त कार्यालयासह तिवसा, चांदूर बाजार, मोर्शी, भातकुली व चांदूर रेल्वे येथे कार्यरत काही कर्मचाऱ्यांनी खोट्या मानीव दिनांकाचा आधार घेत पदोन्नती मिळविल्या. एवढेच नव्हे तर आर्थिक लाभही लाटले. ही चूक लक्षात आणून देत हे प्रकरण पुढे न्यायालयात गेले. दरम्यान न्यायालयाने फटकारल्यानंतरही महसूल प्रशासनाने संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली नाही. त्यामुळे निवृत्त महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले…

Read More

क्रांतीदिनी गुरुकुंजातून पेटली क्रांतीज्योत; आरती, पूजन केले:31 ऑगस्टपर्यत विदर्भभर घुमणार राष्ट्रसंतांच्या विचारांचा संदेश‎

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी योगदान, राष्ट्रनिर्माणाचे कार्य आणि समाजजागृतीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमच्या केंद्रीय प्रचार विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या क्रांतीज्योत यात्रेला क्रांतीदिनानिमित्त उत्साहात प्रारंभ झाला. ९ ते ३१ ऑगस्टदरम्यान ही यात्रा संपूर्ण विदर्भातील विविध जिल्हे व गावांमध्ये मार्गक्रमण करीत राष्ट्रभक्ती, ग्रामविकास, सामाजिक समता, स्वावलंबन आणि मानवतेचा…

Read More

आमझरी, खटकली परिसरात पर्यटन संकुल उभारण्याचे आयुक्तांचे निर्देश:होम-स्टे लाभार्थ्यांशी लीना बनसोड यांनी साधला संवाद‎

चिखलदरा तालुक्यातील आमझरी व खटकली या गावात पर्यटन विकासाच्या मोठ्या संधी असून स्थानिक आदिवासी समाजाला नव्या रोजगाराच्या मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने येथे पर्यटन संकुल उभरण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश आदिवासी विकास आयुक्त व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी दिले. येथील वनविभागाच्या आमझरी संकुलात आयोजित संवाद बैठकीत त्यांनी हे निर्देश…

Read More

सेन्सेक्समध्ये 200+ अंकांची घसरण:77,900 च्या पातळीवर व्यवहार सुरू, निफ्टीही 50 अंक घसरला; रियल्टी, FMCG शेअर्समध्ये जास्त विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 200 अंकांनी अधिक घसरणीसह 77,900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 50 अंकांनी अधिक घसरण होऊन 24,400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. रिअल्टी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये आज जास्त घसरण झाली आहे. मोलबायो डायग्नोस्टिक्स आणि धूत ट्रान्समिशनच्या IPO चा आज शेवटचा दिवस मोलबायो डायग्नोस्टिक्स आणि…

Read More

विद्यापीठाचा ऐतिहासिक पुढाकार; महाराष्ट्रासाठी ठरणार दिशादर्शक:एनईपी 2020 अंतर्गत कार्यभार नियोजनासाठी एकदिवसीय प्रशिक्षण‎

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० मुळे उच्च शिक्षण व्यवस्थेत झालेल्या व्यापक बदलांच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमधील शैक्षणिक कार्यभार निश्चिती आणि आवश्यक पदसंख्या निर्धारणाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने पुढाकार घेत तयार केलेले विनियम क्र. ११ व १२/२०२६ हे महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याचे प्रतिपादन श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:‘पीएम मित्रा टेक्सटाइल पार्क’मध्ये 150 भूखंड, एमओयू 5 कंपन्यांसोबत, 10 हजार कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा, 3 लाख रोजगाराची प्रतिक्षा‎

प्रतिनिधी | अमरावती नांदगावपेठ एमआयडीसीत पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क केंद्र शासनाकडून मिळाले त्याला दोन ते अडीच वर्षे उलटली तरी विकासाची संथगती बघता हा पार्क केव्हा पूर्णत्वास जाणार. येथे केव्हा मोठी गुंतवणूक येणार, केव्हा लाखोच्या संख्येत रोजगार मिळणार, असे एका अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. येथे येण्यास उत्सुक असलेल्या कंपन्यांची संख्या फारच मोजकी आहे. १०२० एकर जागेतील…

Read More

धुरंधर अभिनेते राकेश बेदी सांभाळणार RCLचे कर्णधारपद:भुकेविरुद्ध क्रिकेटमधून बदलाची सुरुवात, आता प्रत्येक धाव भुकेल्यांची थाळी भरेल

बॉलिवूडची मैफल सजली, तारे जमले आणि चर्चा क्रिकेटची झाली, पण यावेळी प्रकरण फक्त चौके-छक्क्यांचे नाही. अभिनेता राकेश बेदी क्रिकेटच्या मैदानावर कर्णधारपद भूषवतील आणि त्यांच्या प्रत्येक धावेचा संबंध गरजूंच्या ताटाशी असेल. आरसीएल सीझन-4 मध्ये क्रिकेट, मनोरंजन आणि सामाजिक बांधिलकीचा संगम पाहायला मिळेल, जिथे विजय केवळ ट्रॉफीचा नाही, तर कोणाची तरी भूक मिटवण्याचाही असेल. मुंबईत मनोरंजन विश्वातील…

Read More