Headlines

जरांगेंवर गुन्हा दाखल करा, तैलिक समितीची मागणी:पालकमंत्र्यांबाबत अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत अपमानास्पद आणि जातीय स्वरूपाची वक्तव्ये केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पुढे आली आहे. तैलिक समितीने मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला या मागणीचे निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांच्यावतीने उपजिल्हाधिकारी ज्ञानेश घ्यार यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदनात नमूद केल्यानुसार,…

Read More

इर्विन रुग्णालयातील अव्यवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक:अधिकाऱ्यांना निवेदन, 15 दिवसांत उपाययोजनेची मागणी

अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) मधील आरोग्य सुविधांच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात आज, मंगळवारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांना निवेदन देण्यात आले. रुग्णालयातील समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आगामी १५ दिवसांत या समस्यांवर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन…

Read More

जिल्हा परिषद अधिकारी मुंबईत:पीआरसीसमोर साक्ष देण्यासाठी पोहोचले, कामकाज प्रभावित

अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि सर्व खातेप्रमुख पंचायत राज समितीसमोर (पीआरसी) साक्ष देण्यासाठी मुंबईत गेले आहेत. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम झाला असून, केवळ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कामकाज सुरू आहे. राज्याचे ग्रामविकास सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या अधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण केले आहे. सन २०१६ चा लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवाल आणि…

Read More

महसूलमध्ये 'मानीव दिनांक' पदोन्नती घोटाळा:न्यायालयीन आदेशानंतरही कारवाई नाही, निवृत्त कर्मचाऱ्यांचे 15 ऑगस्टला आंदोलन

विभागीय आयुक्त कार्यालय तसेच तिवसा, चांदूर बाजार, मोर्शी, भातकुली आणि चांदूर रेल्वे येथील काही कर्मचाऱ्यांनी खोट्या ‘मानीव दिनांका’चा आधार घेऊन पदोन्नती मिळवल्याचा आणि आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने फटकारल्यानंतरही महसूल प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई केली नाही. यामुळे संतप्त झालेल्या निवृत्त महसूल कर्मचाऱ्यांनी १५ ऑगस्ट रोजी आंदोलनाची घोषणा केली आहे. हा पदोन्नती घोटाळा…

Read More

जिल्हा परिषदेत 520 शिक्षकांची पदे रिक्त:प्राथमिक 506, माध्यमिक 14; पेसा-नॉन पेसा जागा जाहीर

अमरावती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांची एकूण ५२० पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाने ही पदसंख्या जाहीर केली असून, यामध्ये पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रातील जागांचा समावेश आहे. या ५२० रिक्त पदांपैकी ४६७ जागा मेळघाटमधील ‘पेसा’ (PESA) क्षेत्रासाठी आहेत, ज्या विशेषतः पेसा कायद्यांतर्गत भरल्या जातील. उर्वरित ५३ जागा ‘नॉन-पेसा’ क्षेत्रातील आहेत, ज्यांची…

Read More

FSSAI Bans Plastic Packaging for Pan Masala; New Guidelines Issued 2026

नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने पान मसाल्याच्या पॅकेजिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. नवीन नियमांनुसार, कंपन्या आता फक्त प्लास्टिक-मुक्त कागद, टिन किंवा काचेच्या कंटेनरमध्येच पान मसाला पॅक करून विकू शकतील. आता कंपन्यांना नवीन पर्यावरणपूरक पर्यायांकडे वळावे लागेल. FSSAI ने या संदर्भात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स (पॅकेजिंग)…

Read More

FO ट्रेडिंगमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान कमी होऊन ₹91,685 कोटी झाले:सेबीच्या कठोर नियमांचा परिणाम; प्रत्येक गुंतवणूकदाराचे सरासरी नुकसान वाढून ₹1.16 लाख झाले

भारतीय शेअर बाजारातील इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजेच FO सेगमेंटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना होणारे एकूण नुकसान आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कमी होऊन 91,685 कोटी रुपयांवर आले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये हा आकडा 1.12 लाख कोटी रुपये होता. अर्थ मंत्रालयाने 11 ऑगस्ट रोजी संसदेला ही महत्त्वाची माहिती दिली आहे. मार्केट रेग्युलेटर सेबीने FO सेगमेंटमधील जोखीम कमी करण्यासाठी उचललेल्या…

Read More

राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्रे, 4 लाख रोजगार:महाराष्ट्राला सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार

महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी (GCC) भारतातील आघाडीचे आणि सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. राज्यात ४०० नवीन जागतिक क्षमता केंद्रे, ४ लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल कॉनराड येथे आयोजित जीसीसीप्रोज नेतृत्व शिखर…

Read More

एअर इंडिया विमान टर्ब्युलन्स तपास, दावा-पायलटने गांजा घेतला होता:दुसरा ड्रग टेस्टही पॉझिटिव्ह; फुकेट-दिल्ली विमान अचानक 300 फूट खाली आले होते

थायलंडमधील फुकेट येथून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील टर्ब्युलन्स प्रकरणात आरोपी पायलटची दुसरी ड्रग टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, पायलट गांजाच्या नशेत होता. DGCA ने सध्या विमान उडवणाऱ्या दोन्ही पायलटना चौकशी पूर्ण होईपर्यंत ड्युटीवरून हटवले आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. AAIB…

Read More

महापौर निवासाचे 'रामदूत' नामकरण वादात:माजी महापौर संघटना, ठाकरे गटाचा तीव्र विरोध; प्रस्ताव मागे घेण्याची मागणी

पुणे महानगरपालिकेच्या महापौर निवासाचे नाव बदलून ‘रामदूत’ करण्याच्या प्रस्तावावरून शहराच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. स्वीकृत नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी हा प्रस्ताव दिला असून, याला माजी महापौर संघटना आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. घोले रोड येथील या महापौर निवासाचे नाव न बदलता ते पूर्वीप्रमाणेच कायम ठेवावे, अशी मागणी पुणे…

Read More