Headlines

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याला वेग:10 ऑगस्टला मिळालेल्या 300 कोटींपैकी 45 कोटी एका दिवसात वितरित

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परताव्याच्या वितरणाला गती मिळाली आहे. १० ऑगस्ट रोजी महामंडळाला प्राप्त झालेल्या ३०० कोटी रुपयांपैकी ४५ कोटी रुपयांचा व्याज परतावा अवघ्या एका दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र शासनाने महामंडळाच्या विविध योजनांसाठी ७५० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. यापैकी…

Read More

भारतीय युवकांमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता:प्रा. राम शिंदे यांचे एमआयटी एडीटीच्या स्थापना दिनी प्रतिपादन

शिक्षण हे केवळ करिअर घडविण्याचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. घरातील पहिला पदवीधर स्वतःचे भविष्य घडविण्यासोबत संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग खुला करतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. आ. राम शिंदे यांनी केले. भारतीय युवकांमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असून, जग वेगाने बदलत असताना या बदलाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारतीय युवकांमध्ये आहे, असेही…

Read More

गणेशोत्सव डीजेमुक्त करा:पुणे पोलिसांनी ध्वनीप्रदूषण नियमांची कडक अंमलबजावणी करावी, 15 संस्थांची मागणी

पुण्यातील १५ स्वयंसेवी संस्थांनी आगामी गणेशोत्सव डीजेमुक्त साजरा करण्याची मागणी केली आहे. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची पुणे पोलिसांनी कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहनही या संस्थांनी केले आहे. वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी पुणे पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे. सण, समारंभ आणि उत्सवांमध्ये ध्वनीवर्धकांचा वाढता वापर तसेच…

Read More

नागपुरात 90 कोटी 25 लाखांचा सायबर घोटाळा उघड:आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, 6 जणांना अटक

नागपूर शहर सायबर पोलिसांनी ९० कोटी २५ लाख रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांमध्ये खाती उघडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या या टोळीतील महिलांसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना दिघोरी नाका परिसरातील पवनपुत्र नगर आणि हुडकेश्वर येथील गजानन नगरमध्ये एका घरातून हे सायबर फसवणुकीचे रॅकेट चालवले जात असल्याची…

Read More

'एकाचे हक्क ओरबाडून दुसऱ्याला देणार नाही':आरक्षणाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका, म्हणाले- हे सरकार संविधानानुसारच चालेल

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या आणि विविध समाजांच्या मागण्यांवरून सरकारची भूमिका स्पष्ट करताना, ‘राज्य सरकार कोणाच्याही दबावाने किंवा नियमबाह्य पद्धतीने चालणार नाही, तर ते केवळ संविधानानुसारच चालेल,’ असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. मराठा समाजासाठी विद्यमान सरकारने केलेल्या ऐतिहासिक कामांचा दाखला देत, मराठा, ओबीसी, एससी आणि एसटी अशा सर्वच समाजघटकांना समान न्याय देण्याची सरकारची…

Read More

Maharashtra Clinical Establishments Bill 2026: Demand for Patient Rights

राज्य शासनाने विधिमंडळात मांडलेल्या ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स विधेयक- २०२६’ च्या मसुद्यात सुधारणा करण्याची मागणी जन आरोग्य अभियानाने केली आहे. या विधेयकात ‘राष्ट्रीय रुग्ण हक्क सनदे’तील सर्व २० मूलभूत रुग्णहक्कांचा समावेश करावा आणि रुग्णालयांच्या उप . सध्याचा मसुदा रुग्णहिताला बाधा पोहोचवणारा आणि नोकरशाहीचे वर्चस्व निर्माण करणारा असल्याचा आरोप जन आरोग्य अभियानाने केला आहे. या मसुद्यामुळे बिल न…

Read More

कोलकातामध्ये ममता बॅनर्जींविरोधात 'चोर-चोर'च्या घोषणा:3 दिवसांत दुसरी घटना; गाडीवर दगड आणि चिखल फेकला होता

कोलकातामध्ये मंगळवारी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यक्रमात काही लोकांनी चोर, चोर अशा घोषणा दिल्या. ममता यांच्यासोबत तीन दिवसांत घडलेली ही दुसरी घटना आहे. रविवारी हलीसहरमध्येही ममता यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. टीएमसीने हा कार्यक्रम भाजप खासदार नागेंद्र रॉय यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीच्या निषेधार्थ ठेवला होता. घोषणाबाजीमुळे…

Read More

Ram Shinde Honors Captain Mishra

‘एमआयटी एडीटी’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ‘एखाद्या घरातील पहिला पदवीधर केवळ स्वतःचे भविष्य घडवत नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग खुला करतो. त्यामुळे शिक्षण हे केवळ करिअर घडविण्याचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. आजचा काळ संधीचा काळ आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबो . राम शिंदे…

Read More

तिरंग्याचा मान-सन्मान कधीही झुकू देणार नाही:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यात निर्धार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुण्यात आयोजित भव्य ‘तिरंगा यात्रे’त सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ‘तिरंग्याचा मान-सन्मान, अभिमान आणि स्वाभिमान कधीही झुकू देणार नाही,’ असा ठाम निर्धार व्यक्त केला. विकसित भारताच्या निर्मितीसाठी तरुणांनी तिरंगा हाती घेतल्याचे सांगत, त्यांनी राज्यघटनेतील अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचे स्मरण ठेवण्याचे आवाहनही केले. स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला मानवंदना देण्यासाठी…

Read More

मंत्र्यांचा दावा- हेमंत सोरेन यांच्या हत्येचा प्रयत्न झाला:झारखंडचे CM म्हणाले- विरोधक परजीवींसारखे, विद्यार्थ्यांचा वेश धारण करून राजकारण करत आहेत

झारखंडचे आरोग्य मंत्री इरफान अन्सारी यांनी भाजप आमदारांवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या हत्येचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, “हा केवळ निषेध नव्हता, तर मुख्यमंत्र्यांना मारण्याचा प्रयत्न होता, पण ते वाचले.” मंत्र्यांनी दावा केला की, ज्यावेळी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर भाजपचे आमदार धरणे देत होते, त्यावेळी मुख्यमंत्री आपल्या पत्नी-मुलांसह आत उपस्थित होते. त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे भाजप आमदारांवर…

Read More