पहिल्याच दिवशी 400 टन मोसंबीची आवक:पाचोडला मोसंबी खरेदी-विक्रीस सुरुवात, प्रतिटन 12 ते 18 हजार रुपये दर
पाचोड गतवर्षीच्या झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला विसरून पुन्हा नव्या दमाने यंदाच्या मोसंबी हंगामाला पाचोड (ता. पैठण) येथील मोसंबी मार्केटमध्ये सोमवारी (ता.१०) पासून शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे हित जोपासत सुरुवात झाली आहे. दरम्यान, मोसंबी खरेदीच्या पहिल्याच दिवशी जवळपास ४०० टन मोसंबीची आवक झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नितीन विखे, मोसंबी मार्केटचे अध्यक्ष अय्युब पठाण व केंद्रप्रमुख गणेश…