आढावा बैठक:जन्म-मृत्यूच्या नोंदणीची प्रक्रिया सात दिवसांमध्ये पूर्ण करा- महापौर श्रीचंद तेजवानी
प्रतिनिधी । अमरावती जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण करण्यासह प्रमाणपत्रांचे वितरण करण्याचे निर्देश बुधवारी ५ रोजी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी मनपाच्या आरोग्य विभागाला दिले. स्व.सुदामकाका देशमुख सभागृहात मनपाच्या जन्म-मृत्यू विभागाच्या कामाचा आढावा घेत विभागाच्या दैनंदिन कामकाजाची, प्रलंबित प्रकरणांची, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती जाणून घेतली. यावेळी जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया कार्यक्षम, पारदर्शक, नागरिकाभिमुख करण्यावर भर…