कन्नडच्या मुंगसापूरची घटना:स्मशानभूमीअभावी पावसातच अंत्यसंस्कार, चिखल तुडवत शेतात 81 वर्षीय वृद्ध महिलेस शेवटचा निरोप
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होऊनही मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या मुंगसापूर (ता. कन्नड) गावात स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने ८१ वर्षीय वृद्ध महिला गंगूबाई रामहरी गायकवाड यांच्या पार्थिवावर भरपावसात, चिखलाची वाट तुडवत एका खासगी शेतात अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. दरम्यान, प्रशासनाने तत्काळ स्मशानभुमीचा प्रश्न सोडवला नाही तर पुढील वेळी प्रशासकीय कार्यालयात अंत्यसंस्कार करण्याचा इशारा देण्यात आला आहे….