महायुतीत पुन्हा वाद उफाळला:एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत, ..तर चंद्रकांत पाटलांचे कारनामे सोशल मीडियावर आणू- रवींद्र धंगेकर
महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, भाजप नेत्यांच्या वक्तृत्वावर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आज राज्यात भाजप जी सत्तेत आहे, ती केवळ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची कृपा आहे, असे ठणकावून सांगत धंगेकरांनी भाजपला शिवसेनेचे आभार मानण्याचा सल्ला दिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत…