40 कोटींचे कंत्राट, तरीही शहरात धुवारणीसाठी पालिकेचीच कसरत:प्रत्येकी 3 लाखाच्या दोन व्हेईकल फाऊंटन मशीनची खरेदी
. महानगर पालिका प्रशासनाने कोणार्कला वर्षाला ४० कोटी रुपयांचे स्वच्छतेचे कंत्राट दिले असताना त्यात धुवारणी (फॉगिंग), फवारणीचा (स्प्रेईंग) आश्चर्यजनकपणे समावेश केला नाही. एकप्रकारे स्वच्छता कंत्राटदाराला सोयीस्कर सूट देण्यात आली. त्यामुळे आता साथरोगांवर नियंत्रणासाठी पावसाळ्याचे दोन महिने आटोपल्यानंतर खुद्द मनपा प्रशासनालाच धुवारणी, फवारणीचे काम करावे लागत आहे. यासाठी त्यांना प्रत्येकी ३ लाखाच्या दोन व्हेईकल फाऊंटन मशीनची…