मानवेढेत आठ दिवसांपासून वीज नाही, ग्रामस्थांचा ठिय्या:महावितरणच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव
मानवेढे गावात महिनाभरापासून विजेच्या लपंडाव सुरू आहे. त्यात ८ दिवसांपासून विजच नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी महिलांसह लहान मुलांना घेऊन थेट इगतपुरी तहसील कार्यालयात धाव घेतली. ग्रामस्थ तहसील कार्यालयात आल्याची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी माळी दाखल झाले. संतप्त महिला, तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना…