भारत-अमेरिकेच्या कृषी कराराला किसान युनियनकडून तीव्र विरोध:केंद्राने शेतकरी संघटनांशी चर्चा करावी, जालन्यात राकेश टिकैत यांची मागणी
भारत-अमेरिका प्रस्तावित कृषी आणि व्यापार करारावरून शेतकरी संघटनांनी पुन्हा संघर्षाची भूमिका घेतली आहे.शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड मान्य नसल्याची भूमिका भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत यांनी मांडली. . कृषी क्षेत्राशी संबंधित कोणताही आंतरराष्ट्रीय करार करताना सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण झाले पाहिजे. अन्यथा त्याचे परिणाम थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतील, असे टिकैत म्हणाले. महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणीला…