अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीने विषमतेवर हल्ला चढवला- जोगदंड:अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा
कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे समग्र लेखन वंचित, शोषितांच्या दमनाविरूद्ध उभे राहिले. त्यांच्या लेखणीने विषमतेवर हल्ला चढवला. हाच वारसा युवा पिढीने पुढे न्यावा, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड यांनी शिवाजी महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात…