प्लाझ्मा स्पीकर, लेझर लाईटवर बंदीची मागणी:मिरवणुकांमधील कर्णकर्कश आवाजाचा त्रास टाळण्यासाठी कठोर अंमलबजावणीची अपेक्षा
पुणे येथे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी गणेशोत्सव, दहीहंडी, ईद आणि महापुरुषांच्या जयंतीच्या मिरवणुकांमधील कर्णकर्कश आवाजाचा त्रास टाळण्यासाठी प्लाझ्मा स्पीकर आणि लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. डीजेचा आवाज निर्धारित डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त नसावा, याची प्रशासनाने कठोर अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कर्णकर्कश आवाजावर बंदी घालण्याच्या…