गणपतीच्या भंडाऱ्यासाठीही अन्न परवाना सक्तीचा!:तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केली 'FDA'ची भूमिका; म्हणाले- 'सण असो वा उत्सव, नियमांचे पालन आवश्यकच'
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या विभागाच्या कामकाजाची माहिती देताना, राज्यभरात तब्बल 3100 आस्थापनांची तपासणी करण्यात आल्याचे सांगितले. तसेच, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध गणेश मंडळांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसाद आणि भंडाऱ्याच्या आयोजनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी एफडीएची अधिकृत भूमिकाही स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांना गणपतीच्या…