Headlines

संभाजीनगरात यंदाही गणेशोत्सवात डीजेबंदी:शांतता समितीचा निर्णय, डीजेचालकांचा पोलिस आयुक्तांना घेराव

शहरातील गणेशोत्सव गतवर्षीप्रमाणे यावर्षीही डीजेमुक्त करा. गणेश मंडळे आणि नागरिकांचा उत्साह वाढवण्यासाठी शेवटचे पाच दिवस देखावे मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवा, असे आदेश पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी एमआयटी महाविद्यालयाच्या मंथन हॉलमध्ये आयोजित शांतता समिती बैठकीत केल्या. डीजेला बंदी केल्याने काही जणांची नाराजी झाली. पण डीजे बंदीमुळे झांज पथक, आकर्षक मानवी देखाव्यांचा सहभाग वाढत आहे. ही बाब…

Read Full News

‘वाळूच्या ट्रिपचे 10 हजार देतो’ची थाप मारून ‘समृद्धी’वरील दरोडेखोर पकडले:संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची बीडमध्ये वेशांतर करून कारवाई

समृद्धी महामार्गावर वाहनचालकाला अडवून लुटणाऱ्या टोळीतील फरार आरोपींना पकडण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला. ‘वाळूचा हायवा चालवायचा आहे, एका ट्रिपचे तब्बल १० हजार रुपये देऊ,’ अशी थाप पोलिसांनी मारली. या आमिषाला भुलून आरोपी . ओमकार रामचंद्र फसले (२२, रा. म्हाळस जवळा, जि. बीड), भीमराव ऊर्फ शहादेव भगवान तांदळे (२६, रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी),…

Read Full News

प्रगतिशील शेतकरी:शेतात कर्टुले पिकवून आठवड्याला 40 हजारांची कमाई; छत्रपती संभाजीनगरच्या पदवीधर तरुणाचा दीड एकरात प्रयोग

एरवी केवळ पावसाळ्यात डोंगरदऱ्यांत किंवा शेताच्या बांधांवर नैसर्गिकरीत्या उगवणारी दुर्लक्षित रानभाजी म्हणजे ‘कर्टुले’ (करटोली). मात्र, याच रानभाजीला मुख्य प्रवाहातील नगदी पीक बनवून फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील बी.एससी पदवीधर कृष्णा फलके या उच्चशिक्षित तरुणाने शेतीत नवा प्रयोग केला आहे. पारंपरिक पिकांच्या चक्रातून बाहेर पडत त्यांनी अवघ्या दीड एकर शेतात कर्टुल्याची यशस्वी व्यावसायिक लागवड केली. त्यातून ते…

Read Full News

डीजेच्या दणदणाटामुळे वडिलांचा बळी गेला..:लेकाला फिट्स येतात, पुणेकर महिलेची मन हेलावणारी व्यथा

पुण्यातील जगप्रसिद्ध गणेशोत्सव यंदा डीजे आणि लाऊडस्पीकरच्या ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून चांगलाच गाजत आहे. पुण्याचे नागरिक विद्यानंद बापट यांनी पुणे महापालिकेत डीजे विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना नागरिकांचा पाठिंबा मिळू लागला. मात्र त्यानंतर गणेश मंडळांनी बापट यांच्या विरोधात रान पेटवले. विद्यानंद बापट हे एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना चव्हाण नावाच्या एका गणेशभक्ताने त्यांच्या कानशिलात लगावल्याने हे प्रकरण अधिकच तापले….

Read Full News

निंभोरा देलवाडी येथील जि. प. शाळेत विद्यार्थीच बनले शिक्षक:'स्वयंशिस्त विद्यालय' उपक्रमातून मिळाली नेतृत्वाची संधी; अनोखा शिक्षक दिन साजरा

निंभोरा देलवाडी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शिक्षक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा होतो. शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांनाच शिक्षक बनवले. त्यांनी ‘स्वयंशिस्त विद्यालय’ हा उपक्रम राबवला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तसेच, शाळेचे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज अनुभवता आले….

Read Full News

एडीसीसी बँक गैरव्यवहार: संचालकांची चौकशी रोखणारा आदेश रद्द:उच्च न्यायालयाचे निर्देश, प्राथमिक चौकशी करून एफआयआर नोंदवा

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (एडीसीसी) कथित आर्थिक गैरव्यवहार आणि निधीच्या अपहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. बँकेच्या संचालकांवरील चौकशी थांबवणारा जिल्हा उपनिबंधकांचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. शहर कोतवाली पोलीस ठाणे आणि आर्थिक गुन्हे शाखेला (ईओडब्ल्यू) तातडीने प्राथमिक चौकशी पूर्ण करून गुन्हा आढळल्यास एफआयआर नोंदवण्याचे स्पष्ट निर्देश दिले…

Read Full News

'गणेशोत्सवात दंगली घडवल्या जातील':राज ठाकरेंच्या दाव्याला आदित्य ठाकरेंचाही दुजोरा, काय म्हणाले ठाकरे?

गणेशोत्सवादरम्यान लोकांचे मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात दंगली घडवल्या जातील, या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात केलेल्या खळबळजनक दाव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सण जवळ आलेला असताना आणि डीजेसारख्या मुद्द्यांवरून आधीच वाद सुरू असताना आलेल्या या वक्तव्याला आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही उघडपणे दुजोरा…

Read Full News

कर्जतमध्ये बालके व गरोदर मातांच्या आहारावर डल्ला:भ्रष्टाचाराला वाचा फोडणाऱ्या मदतनीसावर राजीनाम्याची वेळ; अमृत आहार योजनेत मोठा गैरव्यवहार

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या वरची भागुची वाडी अंगणवाडीत बालके आणि गरोदर मातांना अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अंगणवाडी मदतनीस महिलेला मात्र मानसिक छळाला कंटाळून आपला राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे एकात्मिक बाल विकास विभागाच्या एकूणच कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले…

Read Full News

नागपूरच्या 145 वर्षांच्या मारबत महोत्सवाला सुरुवात:यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी मनपाचे विशेष प्रयत्न; 11 सप्टेंबरला मुख्य उत्सव

नागपूरचा १४५ वर्षांचा ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ रविवारपासून सुरू झाला. नागपूरची ही एक खास सांस्कृतिक ओळख आहे. यंदा हा उत्सव फक्त शहरातच नाही, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने तयारी केली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते काळी आणि पिवळी मारबत यांची पूजा करून महोत्सवाचे उद्घाटन झाले. मुख्य मारबत उत्सव…

Read Full News

अमरावतीत MPSC परीक्षेला 1318 उमेदवार गैरहजर:मुंबईच्या नगरपाल कार्यालयातील बेलीफ आणि लिपिक पदासाठी होती परीक्षा; 3200 पैकी 1889 जण उपस्थित

मुंबईच्या नगरपाल (शरीफ) कार्यालयातील बेलीफ आणि लिपिक (गट क) या पदांसाठी रविवारी अमरावतीत स्पर्धा परीक्षा झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) या परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेसाठी एकूण ३२०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात १८८९ उमेदवारांनीच हजेरी लावली. त्यामुळे तब्बल १३१८ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. विद्यार्थ्यांना सकाळी ७ वाजताच परीक्षा केंद्रांवर हजर राहण्याचे आदेश…

Read Full News