75विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडू मातीच्या पर्यावरणपूरक अन् सुबक श्री गणेश मूर्ती:भाटगावातील नूतन माध्यमिक विद्यालयात कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
. सर्वांचाच आवडता बाप्पांचा गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या स्वागताची लगबग सुरू असताना हा उत्सव पर्यावरणपूरक व्हावा व पर्यावरणाची हानी होऊ नये या उद्देशाने भाटगाव (ता. चांदवड) येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शाडूमातीपासून गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या एकूण ७५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कलाशिक्षक देव हिरे…