![]()
येथील इंद्रराज महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला प्रतिष्ठेचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उत्तमसिंह पवार होते. यावेळी संस्थेचे सचिव अशोक देवरे, अशोक गोडसे, डॉ. जीवन राजपूत तसेच अमोल चापे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित डॉ. रमेश काळे आणि सोमनाथ सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक हा समाज परिवर्तनाचा खरा शिल्पकार असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिरुद्ध मोरे यांनी, तर उपस्थित मान्यवरांचा परिचय डॉ. प्रमोद पाटील यांनी करून दिला. तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा या विशेष पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे डॉ. रमेश काळे, धोत्रा येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूलचे जितेंद्रसिंह राजपूत, बोरगाव बाजार येथील श्री गोरक्ष कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर काळात्रे, सिल्लोड येथील करिअर अकॅडमीचे संचालक विकास साहेबराव लक्कस, तांदुळवाडी येथील श्री छत्रपती विद्यालयाचे भगवान जाधव, सारोळा येथील विद्या विकास माध्यमिक विद्यालयाचे सोमनाथ सोनवणे, पिंपळदरीच्या नॅशनल कनिष्ठ महाविद्यालयाचे शांताराम लोखंडे, लिहाखेडी येथील मुर्डेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र राजपूत, पळशी येथील जोगेश्वरी हायस्कूलचे संदीप सपकाळ, वाडी बु. येथील जव्हार उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ शिंदे, आव्हाना येथील श्री आत्मानंद विद्यालयाचे राजेंद्र वाबळे, पंडित कड, तळणी येथील सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सीमा पालोदे, बोरगाव बाजार येथील जि. प. केंद्रीय शाळाचे विष्णू मोरे, इंद्रराज महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. रामप्रसाद बलरावत, तसेच सिल्लोड येथील रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे एन. बी. वानखेडे यांचा समावेश होता. या पुरस्कार सोहळ्यास शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंद्रराज महाविद्यालयाचे प्राचार्य गुरूदत्त राजपूत, उपप्राचार्य प्रा. व्यंकटेश लांब, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. सी. एम. काळे, प्रा. डॉ. संतोष चौथाईवाले, कार्यालयीन अधीक्षक किरण राजपूत, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Source link
सिल्लोड येथील इंद्रराज महाविद्यालयात आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात:शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार