अमरावतीच्या दहीहंडीवर शिरजगावच्या शिवतांडव पथकाची मोहोर:25 फुटांची दहीहंडी अवघ्या 14.51 सेकंदात फोडून 51 हजारांचे बक्षीस जिंकले
अमरावती येथील राजकमल चौकात शनिवारी दहीहंडीचा थरार रंगला. ‘गोविंदा आला रे आला’च्या गजरात आणि प्रेक्षकांच्या उत्साहात हा उत्सव साजरा झाला. राजकमल चौक मित्रमंडळीने स्थापन केलेल्या नवयुवक विद्यार्थी संघटनेने ‘आपली दहीहंडी’चे आयोजन केले होते. यंदा संघटनेतील तरुण सदस्यांनी संपूर्ण जबाबदारी सांभाळली. शिरजगाव कसबा येथील शिवतांडव दहीहंडी ग्रुपने ५१ हजार रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले. त्यांनी २५ फूट…