Headlines

पुणे महापालिकेत स्फोटांचे आवाज, सायरनचा गजर:अग्निशमन दलाच्या अचानक मॉक ड्रिलने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम; 15 मिनिटांत सज्जतेची चाचणी

महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी दुपारी अचानक स्फोटांसारखे मोठे आवाज आणि सायरनचा गजर ऐकू आल्याने काही काळ भीती आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षात कोणतीही आपत्ती घडलेली नसून अग्निशमन दलाकडून आपत्कालीन प्रतिसादाची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या आवाजांमागील कारणाचा उलगडा झाला. आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिनानिमित्त महापालिकेच्या अग्निशमन दलाने दुपारी चारच्या सुमारास हा…

Read Full News

कारंडवाडीत तरुणाच्या दिशेने गोळीबार:ग्रामस्थांनी धाडसाने पकडले, संशयित पोलिसांच्या ताब्यात

सातारा तालुक्यातील कारंडवाडी येथील बसस्थानक परिसरात सोमवारी (दि. १२) रात्री तरुणाच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अचानक झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ऋषिकेश संतोष माने (वय २८) यांच्यावर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महेश जालिंदर माने याच्यावर करण्यात आला आहे. घटनेनंतर प्रसंगावधान…

Read Full News

मुख्यमंत्री फडणवीस पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर:नागपूरमधील नाराजी दूर करत पुणे विभागातील तयारीचा आढावा घेणार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातील पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी झालेल्या चर्चांनंतर आता मुख्यमंत्री पुणे विभागातील निवडणूक तयारीकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव,…

Read Full News

‘ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत, त्यांना पदावर ठेवणं मोदींसाठी गरजेचं’:पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, केंद्र आणि राज्य सरकारवरही निशाणा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वाची विधाने केली आहेत. ज्ञानेश कुमार सहजासहजी राजीनामा देणार नाहीत, असे मत व्यक्त करत त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिल्यास निवडणूक प्रक्रियेबाबत सरकारची…

Read Full News

साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी!:तीन सुवर्णपदकांसह ‘बेस्ट डॉग’; राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची परंपरा राखण्याचे आव्हान

स्फोटकांचा अचूक शोध, आज्ञाधारकपणा आणि कौशल्याच्या जोरावर सातारा जिल्हा पोलीस दलाच्या ‘आझाद’ने राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात दिमाखदार कामगिरी केली. तीन सुवर्णपदके आणि ‘बेस्ट डॉग ऑफ कम्पिटिशन’चा किताब पटकावत आझादने महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवले. आता मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतही साताऱ्याची मान उंचावण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. पुणे येथे ४ ते १० ऑक्टोबरदरम्यान झालेल्या २१ व्या राज्यस्तरीय पोलीस…

Read Full News

मुरुगन यांनी केंद्रीय मंत्रीपद आणि राज्यसभेचे सदस्यत्व सोडले:पंतप्रधानांना 5 पानांचे पत्र लिहिले, म्हणाले- तामिळनाडूमध्ये भाजप मजबूत करण्यासाठी वेळ देणार

केंद्रीय माहिती आणि प्रसारण, संसदीय कामकाज राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या 5 पानी पत्रात त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुरुगन यांनी पत्रात लिहिले- मला जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात यावे. तामिळनाडूमध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी मला माझा वेळ द्यायचा आहे. तामिळनाडूचे रहिवासी असलेले मुरुगन मध्य प्रदेशातून राज्यसभा…

Read Full News

रणवीर शौरीला हत्येची धमकी मिळाली:लिहिले- लोखंडी रॉडने हल्ला करू, पोलिसांनी तपास सुरू केला; CJP च्या आंदोलनाला विरोध केला होता

कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या रस्त्यावरील आंदोलनाला विरोध केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. १२ ऑक्टोबरच्या रात्री ९:१० वाजता त्यांना दोन वेगवेगळ्या ईमेल आयडीवरून धमकीचे संदेश पाठवण्यात आले. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. रणवीर शौरी यांनी या ईमेलचे स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म…

Read Full News

औंढा नागनाथ येथे नगर पंचायतीसमोर ठाकरे गटाचे ढोल बजावो आंदोलन:दोन दिवस आड पाणी पुरवठा करण्याची मागणी, मुख्याधिकारी गैरहजर असल्याने खुर्चीला चिटकविले निवेदन

औंढा नागनाथ शहराला दोन दिवस आड पाणी पुरवठा करावा यासह इतर मागण्यांसाठी ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी ता. १३ सकाळी आकरा वाजता नगर पंचायत कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलन केले. यावेळी मुख्याधिकारी गैरहजर असल्याने त्यांच्या खुर्चीला मागण्यांचे निवेदन चिटकविण्यात आले. औंढा नागनाथ शहरातील नागरीकांकडून एक महिन्याची नळपट्टी आकारून महिन्यातून दोनच वेळेस पाणी येत अाहे. त्यामुळे नागरीकांचे हाल…

Read Full News

मंदिराच्या गाभाऱ्यातही मुली सुरक्षित नाहीत?:निगडीतील घटनेवर विजय वडेट्टीवार संतप्त, गृहखात्यावर साधला निशाणा

पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मुलगी एकटी असल्याची संधी साधून मेट्रोच्या पिलर उभारणीच्या कामावर कार्यरत असलेल्या एका कामगाराने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला…

Read Full News

Punjab Mansa Activist Parvinder Singh Zhota Murdered During Facebook Live

मानसा5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंजाबमधील मानसा येथे अंमली पदार्थविरोधी कार्यकर्ते परविंदर सिंह झोटा यांची मंगळवारी (13 ऑक्टोबर) सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कार्यकर्ते झोटा मंगळवारी सकाळी फेसबुकवर लाइव्ह आले आणि एका मेडिकल स्टोअरमध्ये पोहोचले. केमिस्ट औषधांच्या नावाखाली अंमली पदार्थ विकत असल्याचा त्यांचा आरोप होता. यावरून त्यांचा केमिस्ट अश्विनीसोबत वाद झाला. याचदरम्यान अश्विनीने त्यांच्यावर तीन…

Read Full News