प्रकृती बरी नसतानाही सुट्टी नाकारल्याचा आरोप:14 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या, आदिवासी मंत्री अशोक उईकेंची आश्रमशाळेला भेट
गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेत आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीचा वसतिगृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 12) सायंकाळी उघडकीस आली. राणू कृष्णा हलामी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रकृती बरी नसल्याने घरी जाण्यासाठी सुट्टी मागितली असतानाही तिला सुट्टी नाकारण्यात आल्याचा आरोप तिच्या…