आमदार गोपीचंद पडळकरांना उच्च न्यायालयाचा दणका!:जिल्हा बँक उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने पडळकर निवडणुकीच्या रिंगणाबाहेर
राज्यात सध्या जिल्हा बँक निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा धक्का बसला आहे. जत सोसायटी गटातून भरलेला त्यांचा उमेदवारी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अवैध ठरवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पडळकर यांना आता या निवडणुकीत उभे राहता येणार नाही. सांगली जिल्हा बँक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी…