Headlines

पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात दोन विद्यार्थी घुसले:सुरक्षारक्षकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल, विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द; वसतिगृहप्रमुखांचा राजीनामा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात शिरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी प्रमोद राठोड, ओंकार गोरे (दोघे सध्या रा. मुलांचे वसतिगृह, शिक्षणशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विद्यापीठातील सुरक्षारक्षक संपत पाटील (वय ५१) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ११ ऑक्टोबर…

Read Full News

Anil Deshmukh Demands 1 Lakh Per Hectare Drought Relief for Maharashtra

“राज्यातील 358 पैकी तब्बल 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती ओढवली असून, सोयाबीन, कापूस, मका यांसारखी पिके करपून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अशा संकटात शेजारील कर्नाटक सरकारने 240 पैकी 217 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करत डीबीटीद्वारे . 12 ऑक्टोबर 2026 रोजी पाठवलेल्या या पत्रात अनिल देशमुख यांनी प्रशासनातील वेळकाढूपणा, कागदी पंचनाम्यांमुळे शेतकऱ्यांची होणारी अडचण आणि निधीच्या…

Read Full News

राहुल गांधींना दिलासा:मानहानी खटल्याच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; महाराष्ट्र सरकारला नोटीस, राहुल यांच्यावर देशभरात असे 16 खटले

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती दिली आहे. हा खटला 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यांशी संबंधित आहे. हे प्रकरण महाराष्ट्रातील ट्रायल कोर्टात सुरू होते. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकार आणि तक्रारदार एमएच श्रीश्रीमल यांना नोटीस बजावली आहे. राहुल…

Read Full News

'कपडे काढा आणि घागरीने संपूर्ण गावाला पाणी पुरवा!':वेळापूरच्या पाणीप्रश्नावरून आमदार उत्तम जानकरांचा वीज अधिकाऱ्यांवर संताप

वेळापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनसाठी गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही वीज कनेक्शन दिले जात नसल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचा संताप अनावर झाला असून त्यांनी थेट वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना, “कपडे काढा आणि घागरीने संपूर्ण गावाला पाणी पुरवा!” अशा शब्दांत सुनावले आहे. वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करत,…

Read Full News

पुण्यात ज्येष्ठ महिलेची 68 लाखांची सायबर फसवणूक:बँक खात्यात काळ्या पैशांचे व्यवहार झाल्याची धमकी देत लुबाडले

पुण्यात सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची ६८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. अटकेची धमकी देऊन चोरट्यांनी ही रक्कम उकळली. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ६५ वर्षीय महिला कोथरूडमधील डहाणूकर कॉलनी परिसरात राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून सांगितले की, त्यांच्या बँक खात्यातून काळ्या पैशांचा व्यवहार झाला आहे…

Read Full News

रोहित पवारांचे कष्ट मान्य, पण विद्यार्थ्यांच्या पदरात शून्य!:भीमनवार सक्तीने नव्हे तर हवापालटासाठी रजेवर; सुषमा अंधारेंचा रोहित पवारांवर पलटवार

“पुण्यात 12 दिवस चाललेले MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन म्हणजे ‘आम्ही युद्धात जिंकलो पण तहात हरलो’ अशी गत झाली आहे. रोहित पवारांनी या आंदोलनाला दिवस-रात्र वेळ दिला, त्यांचे कष्ट आणि योगदान मोठे आहे; पण या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या पदरात काहीच पडले नाही, हेच कटू वास्तव आहे. एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा झाला नाही, डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीवर निर्णय झाला नाही आणि विद्यार्थ्यांवरील…

Read Full News

रायगडमध्ये मोठी दुर्घटना:कस्तुरी लॉजिस्टिक कंपनीचे निर्माणाधीन शेड कोसळले; एका कामगाराचा मृत्यू, 20 ते 25 जखमी

रायगड जिल्ह्यातील मानकिवली गावाजवळ एक भीषण घटना घडली आहे. येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या ‘कस्तुरी लॉजिस्टिक’ कंपनीचे भलेमोठे शेड अचानक कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत तब्बल २० ते २५ कामगार जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मानकिवली…

Read Full News

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची तयारी:विधानसभा प्रभारी जाहीर; दोन्ही मतदारसंघांत 4.50 लाख मतदारांसाठी 1,051 मतदान केंद्रे

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार विधानसभा प्रभारी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यातून पदवीधर निवडणुकीसाठी स्मिता जाधव तर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कौस्तुभ गावडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. भाजपने जाहीर केलेल्या प्रभारी पुढील प्रमाणे आहेत: 4 लाख 50 हजार…

Read Full News

आदिनाथ कोठारेची बॉलिवूडमध्ये मोठी झेप:‘रामायण’सह दोन बिग-बजेट चित्रपटांत झळकणार, ‘रामायण’ आणि ‘नयी नवेली’मधून प्रेक्षकांच्या भेटीला

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे त्यांच्या कारकिर्दीतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बॉलिवूड चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज आहे. मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता आता दोन बड्या बिग-बजेट बॉलिवूड चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी सज्ज होत असून या चित्रपटाचं दिग्दर्शन दोन पूर्णपणे वेगळी दृष्टी असलेल्या दिग्दर्शकांनी केले आहे. आदिनाथ कोठारे “रामायण” मध्ये – दंगलफेम दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित भारतातील सर्वात…

Read Full News

काँग्रेसच्या दयेवर जगण्यापेक्षा एकत्र या!:कोणाची बाहेर ठेवण्याची हिंमत होणार नाही; रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन ऐक्याची साद

“काँग्रेसने दलित, आदिवासी, ओबीसी आणि बौद्ध समाजाला सत्तेत वाटेकरी न समजता केवळ व्होट बँक म्हणून वापरले, हे ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे 100 टक्के खरे आहे. याच कारणामुळे 2011 मध्ये मी काँग्रेसची साथ सोडली होती. काँग्रेस आणि तथाकथित पुरोगामी आघाडीच्या आमंत्रणाची वाट पाहत बसण्यापेक्षा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व रिपब्लिकन शक्तींनी एकत्र…

Read Full News