Headlines

अपघातात आजोबांचा मृत्यू, गंभीर जखमी दोन भावांना डॉक्टरांनी वाचवले:मणिपाल हॉस्पिटलमध्ये मोठ्या भावावर महिनाभर, लहान भावावर शस्त्रक्रियेशिवाय उपचार

रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन चिमुकल्या भावांनी मृत्यूशी दिलेली झुंज यशस्वी ठरली. सहा वर्षांच्या मोठ्या भावाच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती, तर पाच वर्षांच्या लहान भावाच्या यकृत, प्लीहा आणि मूत्रपिंडाला इजा झाली होती. मणिपाल हॉस्पिटल्स मॉमस्टोरी येथील डॉक्टरांनी तातडीने उपचार आणि विविध तज्ज्ञांच्या समन्वयातून दोघांनाही जीवदान दिले. मोठ्या भावाला चार आठवड्यांनंतर, तर लहान भावाला…

Read Full News

वेणुगोपाल म्हणाले- पंजाबला बदल हवा आहे:खरगे यांच्या ‘मोदींचे वडीलही जातील’ या वक्तव्यावर म्हणाले- ही गोष्ट विचारधारेबाबत सांगितली

काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल आज (२६ ऑक्टोबर) चंदीगडमध्ये आहेत. त्यांनी पंजाब काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. बैठकीपूर्वी के. सी. वेणुगोपाल यांनी आपण निवडणूक आणि संघटनेच्या संदर्भात आलो असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले की, पंजाब बदलाची अपेक्षा करत आहे. येथे कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. अंमली पदार्थांच्या माफियाने आपले हातपाय…

Read Full News

500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी SIT स्थापन:IPS शैलेश बलकवडे करणार नेतृत्व; CM देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर कारवाई

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. या एसआयटीचे नेतृत्व आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली होती. या क्लिपमध्ये, आंदोलनावर प्रभाव…

Read Full News

डॉ. अजयकुमार राय यांच्या 'शाश्वत हॉटेल व्यवस्थापन' पुस्तकाचे प्रकाशन:माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ म्हणाले, निसर्गाकडे जाण्याऐवजी स्वतः निसर्ग व्हा

निसर्ग आपल्याला काहीही न मागता भरभरून देत असतो. मात्र, आजच्या जीवनशैलीत आपण निसर्गापासून दूर जात आहोत. मातीशी आपली नाळ जोडलेली असली पाहिजे. हॉटेलमधील कामकाजही निसर्गाशी सुसंगत असणे आवश्यक आहे. निसर्गाचे महत्त्व ओळखून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारली पाहिजे. निसर्गाकडे जाण्याऐवजी स्वतः निसर्ग होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी व्यक्त केले. विश्वाह् क्रिएशन्स…

Read Full News

मनोज ओसवाल यांचा मेनका गांधींवर कंत्राटांसाठी दबाव आणल्याचा आरोप:श्वान निर्बीजीकरणाची कंत्राटे ठरावीक संस्थांना देण्यासाठी दबाव; उच्च न्यायालयात याचिका दाखल

श्वान निर्बीजीकरणाची कंत्राटे ठरावीक संस्थांना मिळवून देण्यासाठी मेनका गांधी महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी मनोज ओसवाल यांनी केला आहे. कुत्र्यांच्या नसबंदी करतात मोठ्या नीतीची तरतूद असलेल्या मोठ्या महापालिकांवर आपली पूर्ण ताकद त्यांच्याकडून केंद्रित केली जात आहे .सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या निधीत नेहमीच्या तुलनेत तीन ते चार पट वाढ झाली आहे….

Read Full News

पुणे पदवीधर-शिक्षक मतमोजणीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण:विभागीय आयुक्तांचे निर्देश, अचूक आणि शांततेत प्रक्रिया पार पाडा

विधान परिषदेसाठी होणाऱ्या पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया नियुक्त सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी समन्वयाने अचूक, शांततेत आणि ताणरहित पद्धतीने यशस्वी करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी आणि विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले. पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघांची मतमोजणी मंगळवार २७ ऑगस्ट रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडीच्या…

Read Full News

अखिलेश म्हणाले- मी साधू-संत नाही, आम्हाला खुर्ची हवी:भाजपाच्या 4 नेत्यांचा सपमध्ये प्रवेश; 5 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या दिल्या

समाजवादी पक्षात आज मोठा प्रवेश झाला आहे. भाजप सोडून 4 मोठ्या चेहऱ्यांनी सपामध्ये प्रवेश केला. यामध्ये बदायूंमधील दातागंजचे भाजपचे दोन वेळा माजी आमदार सिनोद शाक्य आणि बिसौलीचे माजी आमदार कुशाग्र सागर यांचा समावेश आहे. भाजप नेते चंद्र कुमार मिश्रा आणि राम बहादुर पासी हेही अखिलेश यांच्यासोबत आले. माजी आयएएस अधिकारी राम बहादुर पासी हे बसपाच्या…

Read Full News

‘जंगल तोडणारे तुम्हीच महाराष्ट्रद्रोही’:आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, कर्जतच्या प्रकल्पाला विरोध कायम

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ‘महाराष्ट्राची जंगलं नष्ट करणारे आणि आदिवासी पाडे उद्ध्वस्त करणारे तुम्हीच महाराष्ट्रद्रोही आहात,’ अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. विकासाला आमचा…

Read Full News

खरगे म्हणाले- एक नोव्हेंबरला दिल्लीत रॅली होणार:सगळे एकजूट व्हा; व्यापाऱ्यांनी पुढे ढकलण्यास सांगितले होते, ₹10 हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज

मल्लिकार्जुन खरगे यांनी 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या INDIA ब्लॉकच्या रॅलीला दुजोरा दिला आहे. खरगे यांनी X वर लिहिले- हा सणासुदीचा काळ आहे, पण यावेळी तुम्ही कंबरतोड महागाईचा सामना करत आहात. मात्र सरकारला याची अजिबात चिंता नाही, कारण त्यांना फक्त मतांची चोरी कशी करायची हेच माहीत आहे. याच पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबर रोजी नवी…

Read Full News

बॉम्बच्या धमकीनंतर ‘जलसा’ची सुरक्षा वाढवली:तब्येत खराब असूनही चाहत्यांना भेटायला पोहोचले अमिताभ बच्चन; अभिषेक मागे उभा होता

मुंबईस्थित अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याला ‘जलसा’ला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. असे असतानाही बिग बी यांनी रविवारी आपली अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवत घराबाहेर जमलेल्या चाहत्यांचे अभिवादन केले. यावेळी मुलगा अभिषेक बच्चनही त्यांच्यासोबत दिसला. पोलिसांची उपस्थिती आणि बॅरिकेडिंगच्या कडेकोट बंदोबस्तात चाहत्यांशी झालेली त्यांची भेट चर्चेचा विषय ठरली. धमकीनंतर ‘जलसा’बाहेर पोलिसांचा पहारा…

Read Full News