संतापजनक:सोलापुरात शेतकऱ्याचा बळी गेल्यावर गोकुळ शुगरने दिले थकीत ऊस बिल, राज्य शासनकडूनही मदत मिळवून देण्याची जिल्हा प्रशासनाची भूमिका
धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगरने ७ महिने उसाचे बिले थकवले. त्याने आर्थिक विवंचनेत आलेल्या मुस्ती येथील ५० वर्षीय रामचंद्र आप्पाशा कळके या शेतकऱ्याने तणनाशक पिऊन आत्महत्या केली. त्यानंतर सोमवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी भेट घेतली. तिथे त्यांनी दीड लाख रुपये उसाचे बिल आणि अतिरिक्त ५ लाख रुपये असे एकूण…