कळवण आगारातून सप्तश्रृंगगडासह नाशिकसाठी धावणार आधुनिक बस:5 ‘राजमाता जिजाऊ'' बस दाखल; आणखी 10 बस मिळणार
येथील एसटी महामंडळाच्या आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या असून, या बसेसद्वारे कळवण-नाशिक आणि कळवण-सप्तश्रृंगगड मार्गावर सेवा दिली जाणार आहे. या बसेसचे लोकार्पण नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील दुर्गम भागातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या बसेस आगारात दाखल करण्यात आल्या आहेत….