न्यायालयाच्या बंदीनंतरही 'बेस्ट' कर्मचाऱ्यांचे मध्यरात्रीपासून आंदोलन:23 हजार कामगार आजपासून संपावर, मुंबईकरांचे अतोनात हाल
मुंबईची दुसरी जीवनवाहिनी मानली जाणारी ‘बेस्ट’ (BEST) बस सेवा काल (१८ जून) मध्यरात्री १२ वाजेपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. बेस्ट संयुक्त कृती समितीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या या संपाचा मुंबईतील लाखो प्रवाशांना मोठा फटका बसला असून, ऐन सकाळी नोकरदार आणि सर्वसामान्यांचे प्रचंड हाल पाहायला मिळत आहेत. औद्योगिक न्यायालयाने संपावर तात्पुरती बंदी घातलेली असतानाही, तब्बल २३…