जाळीचा देव ते सावळदबारा रस्त्याला मंजुरी द्या:इद्रीस मुलतानी यांची मागणी, येथे येणाऱ्या भाविकांचा 20 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा वाचणार
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र जाळीचा देव ते सावळदबारा या रस्त्याला जिल्हा किंवा ग्रामीण मार्ग म्हणून मान्यता देऊन क्रमांक घोषित करावा, अशी मागणी भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे श्री चक्रधर स्वामी यांचे…