"तुला दुबईत नोकरी हवी तर धर्म बदल’; शिक्षिकेवर अत्याचार:6 तोळे सोनं लुटले, आरोपी पसार, छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
एकाच शाळेत शिकवणाऱ्या सहकाऱ्याने दुबईत नोकरी लावण्याचे व लग्नाचे आमिष दाखवून एका 43 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केला. धर्मांतर करण्यास भाग पाडले. परदेशात नोकरी करण्यासाठी धर्म बदलावा लागेल, असे सांगून आरोपीने पीडितेचे कथित धर्मांतर घडवून आणले. तसेच यूट्यूबवर मंगलाष्टके लावून लग्नाचे नाटक केले. महिलेकडून 3 लाख 41 हजार रुपये रोख आणि 6 तोळे सोने उकळले….