काँग्रेसच्या दोन उमेदवारांचे निलंबन:पक्षनेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्याने कारवाई
विधान परिषद निवडणुकीत पक्षनेतृत्वाला कोणतीही पूर्वकल्पना न देता उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या दोन अधिकृत उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. यवतमाळचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांना काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या या अनपेक्षित माघारीमुळे विदर्भातील दोन्ही जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय निश्चित झाला. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसने साहेबराव…