नितेश राणेंचा मास्टरस्ट्रोक? कोकणात राजकीय भूकंप; ठाकरे गटाच्या उमेदवाराची माघार:NCP चे अनिकेत तटकरेंचा मार्ग मोकळा
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोकण विभागात मोठी राजकीय घडामोड घडली. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संपूर्ण निवडणुकीचे चित्र बदलले आहे. विशेष म्हणजे अर्ज मागे घेण्यापूर्वी बाळ माने हे भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल…