आता जिल्हास्तरीय बहुमानासाठी सज्ज:"मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात' दहिगाव-शे ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम
शेवगाव राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पार पडलेल्या मूल्यमापन प्रक्रियेत शेवगाव तालुक्यातील दहिगाव शे. ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायतीने राबवलेली विविध विकासकामे, स्वच्छता मोहीम, लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे हा बहुमान मिळाला आहे. तालुका स्तरावरील या यशानंतर आता या गावाची निवड जिल्हास्तरीय…