Headlines

पिग्मी एजंटांच्या कमिशनमध्ये कपात:शासनाच्या जाचक निर्णयाविरोधात लाखांदूर येथे संतापाची लाट! सहकार आयुक्तांना निवेदन

सहकारी पतसंस्थांच्या (बिगर शेती) पिग्मी एजंटांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये शासनाने ४% वरून थेट २.५% अशी मोठी कपात केल्यामुळे लाखांदूर तालुक्यातील पिग्मी एजंटांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शासनाचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असून यामुळे एजंटांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार आहे. या जाचक अटी तातडीने रद्द करून पूर्ववत ४% कमिशन लागू करावे, या मागणीसाठी लाखांदूर येथील पतसंस्थांच्या पिग्मी…

Read More

शिल्पा शिंदेने लैंगिक छळाची खोटी केस केल्याचे कबूल केले:हिना खानसह सेलिब्रिटी संतापले, NGOची अटकेची मागणी, शिल्पा म्हणाली- आत्महत्या करणार होते

बिग बॉस 11 ची विजेती आणि ‘भाभीजी घर पर हैं’ अभिनेत्री शिल्पा शिंदे तिच्या अलीकडील पॉडकास्टमुळे वादात सापडली आहे. पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने कबूल केले की तिने तिच्या निर्मात्यांविरुद्ध लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल केली होती. पॉडकास्ट समोर येताच एका स्वयंसेवी संस्थेने शिल्पा शिंदेविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, हिना खान, पूजा बेदी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी…

Read More

ललित मोदी म्हणाले- मी पळपुटा नाही, जगभर फिरतोय:भारत सरकारची पोहोच खूप लांब, तुम्ही त्यांच्याशी पंगा घेऊ शकत नाही

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी ‘फरार’ हा शब्द माध्यमांनी वापरला. त्यांच्याविरोधात आजपर्यंत कोणताही खटला दाखल झालेला नाही. गुरुवारी न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुढे सांगितले की, मी अजिबात पळून जात नाहीये. मी जगभर फिरत आहे. जर मी पळून जात असतो, तर तुम्ही मला कुठेतरी पकडलेच असते. भारत सरकारची पोहोच खूप लांब…

Read More

लाखांदूर तालुक्यात मेणबत्तीच्या उजेडात रुग्णांवर उपचार:रुग्णांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ प्रशासनाच्या अनास्थेचे धिंडवडे काढणारा!

डिजिटल इंडिया आणि प्रगत आरोग्य सेवेचे मोठमोठे दावे केले जात असताना, लाखांदूर तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील पिंपळगाव/को. येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या तब्बल चार महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना मेणबत्ती किंवा मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात रुग्णांवर उपचार करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांच्या आरोग्याशी चाललेला…

Read More

PM सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर:PM सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर; 4,700 घरांवर बसवले

छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य करण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत २९ मे रोजी देशात आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक १५ हजार घरांवर प्रकल्प बसविण्यात आले असून त्यापैकी ४,७०० घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले असून राज्याने ६ लाखापेक्षा…

Read More

दिलीप वळसे-पाटील थेट शरद पवारांच्या भेटीला:'सिल्व्हर ओक'वरुन नवे राजकीय संकेत? राष्ट्रवादीत नेमकं शिजतंय तरी काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांभोवती चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे…

Read More

मुख्यमंत्री आमच्या मागण्यांवर सकारात्मक ते प्रयत्न करतायत:…तर सरकारविरोधात लढायला पुन्हा मैदानात उतरणार, मनोज जरांगेंचा इशारा

मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेणार असे आम्हाला प्रशासनाने सांगितले होते. त्या संदर्भात माहिती मागवण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या तरी कामे होऊ लागले आहेत. आता ते दमतील असे वाटत नाही ते काम करतीलच. काही जणांच्या घरात एकाला प्रमाणपत्र दिले दुसऱ्याला नाही हा विषय आम्ही प्रशासनाला सांगितले. काही जणांकडे पुरावे नाही,…

Read More

शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही बंडखोरी:मंत्री गुलाबराव पाटलांची भाजपवर नाराजी; दुपारपर्यंत बंड थंड करण्याचे भाजपचे आश्वासन

विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीतील धुसफूस थांबण्याचे नाव घेत नाहीये. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर झाली असली, तरी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या जागांवर होणाऱ्या बंडखोरीवरून आक्रमक पवित्रा घेत भाजपला सुनावले आहे. “आम्ही गुवाहाटीला जाऊन उठाव केला नसता, तर आज काय स्थिती असती?” असा संतप्त सवाल गुलाबराव पाटील यांनी भाजपला…

Read More

मूव्ही रिव्ह्यू- पेद्दी:ओळखीच्या लढाईला दमदारपणे दाखवणारा चित्रपट, राम चरणच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनय, पहिला भाग संथ, पण कथा प्रभावी

स्टार- 3.5/5 रनटाइम- 3 तास 8 मिनिटे कलाकार- राम चरण, जान्हवी कपूर, जगपति बाबू अनेकदा काही चित्रपट कथेपेक्षा त्यांच्या भावनांसाठी लक्षात ठेवले जातात. पेद्दी हा असाच एक चित्रपट आहे. ही केवळ एका खेळाडूची कथा नाही, तर अशा लोकांचा आवाज आहे ज्यांची उपस्थिती सरकारी कागदपत्रांमध्येही नोंदलेली नाही. राम चरण आणि दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी एका…

Read More

सन्मान मिळवण्यासाठी लोकाभिमुख कार्य महत्त्वाचे:तहसीलदार रतनव यांचे प्रतिपादन, उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्यासह तिघांना निरोप‎

“प्रशासकीय खुर्चीत काम करताना जनताभिमुख निर्णय घेतल्यास त्याचे समाधान वेगळे असते. कर्तव्य बजावताना पदापेक्षा सेवेने आनंद मिळायला हवा. अशा सन्मानाची सेवापूर्ती खूप कमी लोकांच्या आयुष्यात येते आणि हा सन्मान मिळवण्यासाठी लोकाभिमुख कार्य पार पाडणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कर्जतचे तहसीलदार रवी सतवन यांनी केले. कर्जत पोलीस विभागातर्फे आयोजित सेवापूर्ती सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कर्जतचे…

Read More