गंगापूर ते वैजापूर-भेंडाळा रस्त्यावर साईड पट्टे टाकण्याची नागरिकांनी केली मागणी:या मार्गावर दररोज अपघात होत असल्याने वाहनधारकांत नाराजी
गंगापूर शहरातून छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, नाशिक मुंबईला जाणाऱ्या प्रमुख महामार्गावर मागील अनेक महिन्यांपासून साईटपट्टेच नसल्याने भरधाव चालणाऱ्या वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने नियमित अपघात होत असून ते रोखण्यासाठी तत्काळ पांढरे साईटपट्टे, झेब्रा क्रॉसिंग टाकावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भेंडाळा फाटा ते गंगापूर व गंगापूर ते वैजापूर या अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर दररोज हजारो अवजड व…