Headlines

ओला, उबर, रॅपिडोचे अ‍ॅप हटवण्याच्या आदेशाला स्थगिती:राज्य सरकारने कायदेशीर पेचामुळे 24 तासांतच आपला निर्णय बदलला

महाराष्ट्र सायबर विभागाने राज्यात बेकायदा सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवेवर आळा घालण्यासाठी ओला, उबर, रॅपिडो या कंपन्यांचे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअर व अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून हटवण्याच्या आपल्या आदेशाला अवघ्या 24 तासांतच स्थगिती दिली आहे. सरकार आता या कंपन्यांचे कॅब व ऑटो सेवा विस्कळीत न करता केवळ बेकायदा बाईक टॅक्सी सेवा कशी बंद करायची? या मुद्यावर…

Read More

मुदत संपली तरी 12 नाशिकच्या तालुक्यांना केरोसीनची अद्यापही प्रतीक्षाच:येवला, पेठ, इगतपुरी या तीन तालुक्यांनाच वितरण

अमेरिका आणि इराण युद्धाच्या सावटामुळे देशात इंधन व गॅसटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्यांची चूल पेटती राहावी यासाठी राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांना 61 रुपये प्रतिलिटर दराने केरोसीन देण्याचा निर्णय घेतला. मात्र, नाशिक जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे चित्र आहे. मे महिना अर्धा संपला तरी जिल्ह्यातील 12 तालुके अद्याप केरोसीनच्या प्रतीक्षेत आहेत. 15 तालुक्यांसाठी तहसीलदारांनी…

Read More

सोलापुरात समर्थ सहकारी बँकेची नोंदणी वाचवण्याचा आटापिटा:आरबीआयचे निर्बंध कायम तरीही सहकार घेणार ‘समर्थ’ निवडणूक

आर्थिक घरघर लागलेल्या समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध कायम असतानाही गेल्या आठ महिन्यांत सहकार विभागाने संचालक मंडळावर कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट बँकेची नोंदणी वाचवण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बँकेला प्रारूप मतदार याद्या सादर करण्याचे पत्र दिले. पुढे जाऊन निवडणुकीसाठी रिझर्व्ह बँकेची परवानगीही मिळवली. एनपीएचे प्रमाण वाढल्याने रिझर्व्ह बँकेने 8 ऑक्टोबर…

Read More

नीट पेपरफुटीच्या चौकशीचा आवाका वाढणार:नाशिक येथील बडे क्लासचालक CBI च्या रडारवर; पेपरफुटीत 'टेलिग्राम'चा प्रभावी वापर

नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने शुभम खैरनार नामक तरुणाला अटक केली आहे. त्यानंतर आता येथील अनेक मोठे मासे सीबीआयच्या रडारवर आलेत. यात शहरातील काही प्रतिष्ठित क्लासचालकांचाही समावेश आहे. शुभमनंतर या सर्वांची सीबीआयकडून चौकशी होणार असल्याची माहिती असल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. देशात गत 3 मे रोजी वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची…

Read More

सोलापुरात सीसीटीव्हीवर कापड टाकून दोरखंडाने एटीएम मशीन ओढले:गाडीत घालून नेले, हैदराबाद रस्त्यावरील सग्गम नगर रस्त्यावर पहाटे तीनची घटना

जुना विडी घरकुल पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सग्गम नगरातील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन दोर बांधून कारने बाहेर ओढले. त्यानंतर 300 किलो वजनाचे हे मशीन घेऊन पसार झाल्याची घटना घडली. शुक्रवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली. मशीन फोडत असल्याची माहिती बँकेच्या नियंत्रण कक्षाला मिळताच, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रमोद वाघमारे यांना फोन केला. त्यानंतर पोलिस…

Read More

घोडेगाव बाजारात बोकडाला 1 लाख 11 हजारांचा भाव:‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर सव्वा कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त‎

आगामी २७ तारखेला येणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर, येथील प्रसिद्ध शेळी बाजारात बोकडांची विक्रमी आवक झाली. तर एका देखण्या बोकडाला तब्बल १ लाख ११ हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. हा व्यवहार संपूर्ण बाजारात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, नाशिक, कल्याण आणि ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी व व्यापारी बोकड खरेदी-विक्रीसाठी बाजारात दाखल झाले…

Read More

कृष्णांची छापेमारी, 3 टेम्पो गुटखा जप्त‎:पदभार घेताच बार्शीत गोदामावर छापा; अन्न व औषधाचे पथक न आल्याने गुन्हा नोंद नाही‎

बार्शी उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार हाती घेतल्यानंतर आयपीएस अंजना कृष्णा यांनी शनिवारी (दि. १६) बार्शी शहर पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या बालाजी कॉलनीमधील एका बड्या विक्रेत्याच्या अवैध गुटखा साठा केलेल्या गोदामावर छापा टाकला. या कारवाईत लाखो रुपयांचा तब्बल तीन टेम्पोहून अधिक अवैध गुटखा साठा जप्त करण्यात आला. सदरची कारवाई आयपीएस कृष्णा यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने केली….

Read More

अद्याप तोडगाच नाही; कर्मचाऱ्यांचे आंदोलन:काळ्या फिती लावून काम, उद्यापासून देण्यात येणार धरणे‎

विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला जिल्ह्यात तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांसह विद्यापीठाचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने शैक्षणिक कामकाज विस्कळीत झाले आहे. दरम्यान आगामी सोमवारपासून भोजनावकाशात आपापल्या संस्थेसमोर धरणे, निदर्शने केली जाणार आहेत. शुक्रवार, १४ मेपासून हा लढा सुरु झाला. महासंघाचे अध्यक्ष…

Read More

परिचारिकांचे कामबंद आंदोलन:सेवा विस्कळीत होण्याची भीती, शल्य चिकित्सक, पालकमंत्र्यांची घेतली भेट‎

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे एका महिला अधिपरिचारिकेवर (नर्स) झालेल्या अत्याचाराची स्थानिक पोलिस प्रशासनाने दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या स्थानिक शाखेने आज, शनिवार, १६ मे पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनादरम्यान या परिचारिकांनी आज दिवसभरात पालकमंत्री, जीएमसीचे अधिष्ठाता, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक आणि सिटी कोतवालीचे ठाणेदार यांची स्वतंत्ररित्या…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:कपाशी बियाणे पहिल्याच दिवशी संपले; नाइलाजास्तव अन्य खरेदी

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे विक्रीचा शुभारंभानंतर पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेले कपाशी बियाणे अजित-५ हे वाण संपल्याचे शनिवारी दिसून आले. शेतकऱ्यांनी सकाळीच अनेक कृषी केंद्रांवर धाव घेतली. मात्र त्यांना या बियाण्यांचा साठा संपल्याचे सांगण्यात आले. कृषी केंद्रांचे संचालक, तेथील कर्मचारी शेतकऱ्यांना अन्य बियाणे घेण्याचे सुचवत असल्याचे पहावयास मिळाले. मात्र शेतकरी त्याच वाणावर ठाम होते….

Read More