स्वयंघोषित गुरुमाऊली वीरकरला पाच दिवस पोलिस कोठडी:राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल; आता वीरकर महाराज अडचणीत
सोलापूर जिल्ह्यात भोंदूबाबांविरोधातील पोलिसांची कारवाई आणखी तीव्र झाली असून माढा तालुक्यातील आढेगाव येथील स्वयंघोषित गुरुमाऊली वीरकर याला अखेर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. व्यवसायात प्रगती करून देतो, पैशांची भरभराट घडवतो, अशा प्रकारची आमिषे दाखवत लोकांची फसवणूक केल्याचा आरोप वीरकर याच्यावर करण्यात आला आहे. टेंभुर्णी पोलिसांनी त्याच्यासह त्याचा भाऊ विकास वीरकर यालाही अटक केली होती. या…