नाशिक टीसीएस प्रकरण:निदा खानच्या अडचणीत वाढ, जिल्हा कोर्टाने अंतरिम जामीन फेटाळला; गर्भावस्थेचे कारण ठरवले अमान्य
बहुचर्चित टीसीएस (TCS) बीपीओ कार्यालयातील लैंगिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणातील आरोपी निदा खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यापूर्वी न्यायालयाने तिला कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. आता या निर्णयाविरोधात निदा खानचे वकील मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या…