खा. प्रणितींचा पालकमंत्र्यावर प्रहार, शेतकऱ्यांना धीर:अवकाळीने झालेल्या नुकसानीची खासदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी, पालकमंत्री गोरे यांच्यावर सडेतोड टीका
. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी पंढरपूर तालुक्यातील तनाळी या गावांला भेट देत प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. तसेच शासनाने तातडीच्या उपाययोजना करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी…