पुणे रेल्वे क्लार्कवर चाकूहल्ला करून लूट:डोंबिवलीतून तिघांना अटक, सीसीटीव्हीने उघडकीस
पुणे रेल्वे स्थानकावर वरिष्ठ बुकिंग क्लार्कवर चाकूहल्ला करून जबरी चोरी करणाऱ्या तिघांना बंडगार्डन पोलिसांनी डोंबिवली पूर्व परिसरातून अटक केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून चोरीची रोकड आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. ही घटना 18 ऑगस्ट रोजी रात्री एकच्या सुमारास घडली. फिर्यादी रेल्वे प्रशासनाच्या तिकीटविक्रीचे काम करत…