काश्मीरच्या शोपियानमध्ये 6 संशयित दहशतवादी अटकेत:हँड ग्रेनेड व हिजबुल मुजाहिदीनचे पोस्टर जप्त; पुलवामामध्येही 2 साथीदार पकडले
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री तपासणीदरम्यान 6 संशयित दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून 2 हँड ग्रेनेड आणि हिजबुल मुजाहिदीनचे 5 पोस्टर जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, पुलवामामध्येही सुरक्षा दलांनी यरवान जंगलात शोधमोहिमेदरम्यान दोन संशयित दहशतवादी साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, 12 काडतुसे आणि हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. सुरक्षा यंत्रणा शस्त्रास्त्रांचा…