स्मशानभूमी, आरओ प्लांट व शौचालयांच्या कामांवर प्रश्नचिन्ह:सन 2024 पासून बोगस बिलं काढल्याचा चिखली ग्रामस्थांचा आरोप
मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली-कासवी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विकासकामांधील कथित अनियमितता, बोगस बिले आणि ग्रामपंचायतीच्या एकूण कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक झाले. स्मशानभूमी सौंदर्यीकरण, आरओ प्लांट, ग्रामपंचायत कार्यालयालगतचे शौचालय व नालेसफाई आदी कामांच्या खर्चाचा थेट हिशोब मागत ग्रामस्थांनी प्रशासक, सरपंच व ग्रामसेवकांना घेराव घातला. यामुळे ग्रामसभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामपंचायतीच्या निधीतून नेमका किती पैसा आला, कोणत्या…