Headlines

'तुम्हाला बीफ आवडले का?':केरळमध्ये प्रश्न विचारल्यावर अभिनेत्री मालविका शर्मा अस्वस्थ झाली, म्हणाली- मी शाकाहारी आहे

अभिनेत्री मालविका शर्मा नुकतीच केरळमध्ये एका रिपोर्टरच्या प्रश्नामुळे अस्वस्थ झाली, जेव्हा तिला विचारण्यात आले की तिला बीफ आवडले का. त्यावर अभिनेत्री म्हणाली की ती शाकाहारी आहे. रिपोर्टरच्या प्रश्नावरून सोशल मीडियावर अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली. खरं तर, अभिनेत्री मालविका शर्मा तिच्या आगामी ‘खलिफा’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान केरळमध्ये मीडियाशी बोलत होती. याच दरम्यान तिला विचारण्यात आले की…

Read More

मुंबईत 10 कोटींचा चरस जप्त:वांद्रे टर्मिनसजवळ संशयिताला अटक, 10 किलो 10 ग्रॅम अंमली पदार्थ ताब्यात

मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने मोठी कारवाई करत सुमारे १० कोटी ९ लाख रुपयांचा चरस जप्त केला आहे. या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल १० किलो १० ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आला आहे. मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान ही मोठी कारवाई करण्यात…

Read More

देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार?:'त्यांना तिकडे का पाठवताय…'; मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीच्या चर्चांवर अमृता फडणवीसांचे मिश्किल उत्तर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार असून ते दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही याबाबत उघडपणे भाष्य केले असून, नुकतेच भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीत झालेले संघटनात्मक बदल आणि त्यानंतर फडणवीसांचा पार पडलेला दिल्ली दौरा यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस…

Read More

पुणेकरांनी श्री महालक्ष्मी मंदिरात गणपती मूर्तींना रंगवले:'आपला बाप्पा आपणच रंगवा' उपक्रमात पर्यावरणपूरक मूर्तींना दिले रंगकाम

पारंपरिक पद्धतीने शाडूच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीला रंग देणे, कोरड्या रंगांचा वापर करणे आणि मूर्तीवरील वस्त्रावर सिल्क इफेक्ट करणे अशा अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी आत्मसात करीत पुणेकरांनी आपला लाडका गणपती बाप्पा आपणच रंगवला. गणेशोत्सवात ज्या गणेशमूर्तीचे आपण पूजन करणार आहोत, त्या मूर्ती स्वतःच्या हाताने व कल्पकतेने रंगविण्याचा आनंद पुणेकरांनी घेतला. श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग व तेजोमय कलामंदिर यांच्या…

Read More

चाकण औद्योगिक पट्ट्यात वाहतूक कोंडीवर 'ॲक्शन प्लॅन':31 ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे निर्देश, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून कालबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला आमदार बाबाजी काळे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार…

Read More

JPMorgan Alert | India Food Inflation & Subsidy Burden to Rise in 2027

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 2027 पर्यंत भारतात खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर वाढू शकतात. हा इशारा मल्टीनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म जेपी मॉर्गनने दिला आहे. अहवालानुसार, भारत सरकारवर 3 लाख कोटी रुपयांच्या सबसिडीचा बोजा वाढेल. फर्मने दावा केला आहे की, महागाईचा परिणाम संपूर्ण जगावर होईल. खतांची कमतरता, भू-राजकीय तणाव आणि शक्तिशाली अल निनो वादळामुळे हे संकट अधिक गडद…

Read More

'एआय युगाचा वेध' पुस्तकाचे प्रकाशन:डॉ. दीपक शिकारपूर यांचे पुस्तक संतुलित, परिपूर्ण – डॉ. अरविंद नातू

डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘एआय युगाचा वेध’ या पुस्तकाचे आणि ऑडिओ बुकचे मंगळवारी (दि. १८) प्रकाशन झाले. आयसरचे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू यांनी या पुस्तकाचे कौतुक करत ते कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी समग्र वेध घेणारे, संतुलित आणि परिपूर्ण असल्याचे म्हटले. अमलताश बुक्सतर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन बी. एम. सी. सी. आवारातील डॉ. सायरस पूनावाला…

Read More

पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक वापर फक्त 11 टक्के:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ: कोंडी सोडवण्यासाठी तर्कशुद्ध आराखडा हवा

पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केवळ ११ टक्के असल्याने, तर्कशुद्ध वाहतूक सुधारणा आराखड्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. यामुळेच पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळू शकेल, असे ते म्हणाले. पुणे शहराची लोकसंख्या ६० ते ६५ लाखांपर्यंत पोहोचली असून,…

Read More

किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे 19वे पर्व पुण्यात:22-23 ऑगस्टला, 'ब्रॉट टू यू बाय अर्थ' संकल्पनेवर आधारित

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे १९वे पर्व पुण्यात २२ आणि २३ ऑगस्ट रोजी पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित करण्यात येणार आहे. ‘ब्रॉट टू यू बाय अर्थ’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. निसर्गाशी नाते दृढ करणे, हवामान बदल आणि संवेदनशील पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती…

Read More

नागपूरच्या 12 नामांकित शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!:शाळा परिसरात मोठी खळबळ, खालिस्तानी संघटनेच्या नावे ई-मेल; पोलिस अलर्ट मोडवर

नागपूरमधील 12 नामांकित शाळांना मंगळवारी सकाळी ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हा धमकीचा संदेश धडकला. मुख्याध्यापकांनी हा ई-मेल पाहिल्यानंतर तातडीने याची माहिती पोलिसांना दिली, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रासह पोलिस प्रशासनातही एकच धांदल उडाली. या ई-मेलमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, या शाळा विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक…

Read More